पी एम पी एम एल बस टोल फ्री करा .

Maharashtra varta

 पुणे-सातारा महामार्गावरील पी एम पी एम एल बस सेवा टोल फ्री करा .


कात्रज घाट माथा पी एम पी एम एल मित्र मंडळाची मागणी.





भोर (प्रतिनिधी)

 पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाका येथून ये-जा करणारी पीएमपीएमएल बस सेवा टोल फ्री करावी तसे केल्यास पीएमपीएमएल प्रशासनाची सदस्य व तात्काळ सुरू करण्याची तयारी आहे .बस सेवा टोल फ्री करून भोर वेल्हा पुरंदर भागातील प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नसरापूर येथे  देण्यात आले.


त्या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,

पुणे-सातारा महामार्गावरून भोर ,वेल्हा   तसेच पुरंदर तालुक्याचा काही भाग या परिसरांमधून असंख्य नागरिक शेतकरी विद्यार्थी कामगार रिक्षाचालक छोटे-मोठे व्यवसाय दररोज पुणे शहरामध्ये ये-जा करतात .तर भोर वेल्हा पुरंदर परिसरामध्ये असणाऱ्या तीर्थक्षेत्र व गड किल्ल्यांना भेटी देण्यासाठी पुणे शहरांमधून येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांची पी एम पी एम एल बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु एन एच ए आय व खेड शिवापूर टोल प्रशासन यांचे टोल आकारणी धोरणामुळे सदर मार्गावरील बस सेवाही तोट्यात आहे. या कारणाने पीएमपीएमएल प्रशासनाने सदर बस सेवा बंद केली आहे. वरील प्रकरणी पीएमपीएल प्रशासनाकडे यापूर्वी विविध सामाजिक संघटना यांनी पाठपुरावा केला असता प्राप्त परिस्थितीत बससेवा सुरू करावयाची झाल्यास प्रत्येक प्रवासात पाठीमागे किमान पाच रुपये भाडे वाढ करावी लागेल अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजे एकूणच बसने प्रवास करणारी अतिसामान्य जनता यांमध्ये भरडली जाणार आहे. पुणे शहरापासून लगतच खेड शिवापूर टोल नाका असल्याकारणाने अगोदरच या भागातील प्रगतीचा महामार्ग खुंटला असतानाच या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी या भूमीत छत्रपतींचा हा सर्वसामान्य मावळा सिद्ध झाला व उपजीविकेसाठी स्वतःच्या गावांमध्ये राहून दररोज पुणे शहरात येऊ लागला. खेड शिवापूर टोल नाका कृती समितीच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी च्या आंदोलनानंतर व प्रशासन यांनी एम एच बारा एम एच 14 या चार चाकी वाहनांना टोल मध्ये सवलत दिली ,परंतु ज्या पीएमपीएमएल बस मधून आमच्या स्थानिक गोरगरीब सामान्य नागरिक व विद्यार्थी प्रवास करतात ती बस मात्र अडवली. म्हणजेच आमच्या या मावळ्यांच्या प्रगतीमध्ये पुन्हा अडथळा येऊन उभा ठाकला व पूर्वजांपासून करावा लागलेला संघर्ष परत आमच्याच माती आला तरी भोर व वेल्हे ला पुरंदर या परिसरांमधून येणारे हे गोरगरीब सामान्य प्रवासी सुविधा मिळेल, त्या खासगी वाहनांमधून अव्वाच्या सव्वा पैसे देऊन सुद्धा अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये जीवघेणा प्रवास करत आहे. त्यामधून अनेक अपघात घडले आहेत. यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत .तरी पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाका येथून ये-जा करणारी पीएमपीएमएल बस सेवा टोल फ्री करावी तसे केल्यास पीएमपीएमएल प्रशासनाची सदस्य व तात्काळ सुरू करण्याची तयारी आहे .बस सेवा टोल फ्री करून भोर वेल्हा पुरंदर भागातील प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा.

यावेळी कात्रज घाट माता पीएमपीएमएल कामगार मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष बाबूराव बांदल ,सुनील वालगुडे, आनंद इंगुळकर, उत्तमराव मोरे, विलास मांगडे, आबा रांजणे, तानाजी पिसाळ व कर्मचारी उपस्थित होते.

To Top