LNT कंपनी व नॅशनल ऍग्रोचे काम कौतुकास्पद:-डॉ. विराज सूर्यवंशी.

Maharashtra varta

 LNT कंपनी व नॅशनल ऍग्रोचे काम कौतुकास्पद:-डॉ. विराज सूर्यवंशी.



वेल्हा (प्रतिनिधी)

अन्न वस्त्र, निवारा या तीन माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांवर आपलं जीवन अवलंबून असते .यामध्ये आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे .त्यासाठी आपल्या गावात नॅशनल ऍग्रो फाउंडेशन व एल एन टी.कंपनीने बसवलेला फिल्टर प्लांट या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण हे शुद्ध पाणी द्यावे, तसेच आपल्या घरात परिसरात स्वच्छता ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. व्यायामाबरोबर आपला आहार देखील पोषक व सकस असणे गरजेचे आहे. LNT कंपनी व नॅशनल ऍग्रोचे काम कौतुकास्पद असल्याचे विचार डॉ. विराज सूर्यवंशी यांनी मांडले.

L&t कंपनी आणि नॅशनल ऍग्रो फाउंडेशन द्वारा कातवडी ता. वेल्हा जि. पुणे येथे पिण्याचे पाणी व स्वच्छता आरोग्य जनजागृती शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.त्यावेळेस डॉ. विराज सूर्यवंशी बोलत होते.

या कार्यक्रमासाठी सूर्यवंशी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे चेअरमन डॉ. विराज सूर्यवंशी, पुणे जिल्हा वन्यप्राणी सरक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशीलजी विभुते, तसेच नॅशनल ऍग्रो फाऊंडेशनचे जॉइन्ट डायरेक्टर विश्व लिंगम, तसेच असिस्टंट इंजिनिअर विष्णू प्रकाश ,प्रोजेक्ट असिस्टंट सुमित पानसरे ,प्रोजेक्ट असिस्टंट मनीषा चव्हाण, आदिनाथ चव्हाण कैलास पिलाने, अंकुश पिलाने, भीका पिलाने व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 या वेळेस नॅशनल ऍग्रो फाउंडेशनच्या वतीने महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप तसेच मास्क,सॅनिटायझर चे वाटप  करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व पत्रकार  विठ्ठल पवार यांनी केले.

नॅशनल ऍग्रो फाउंडेशन यांनी एल. एन. टी.कंपनीच्या वतीने कातवडी येथे एक कोटीहून अधिक विकास कामे केलेली आहेत. हे गाव दत्तक घेऊन विकासाचे रोल मॉडेल बनविण्याचा चांगला  प्रयत्न केला आहे.त्यामध्ये बंधारे, शेततलाव, राईस मिल ,पिठाची गिरण ,मसाला कांड,प सोलर लॅम्प, बंदिस्त गटारे ,शौचालये वैयक्तिक, खत कुजवण्यासाठी चे खड्डे व प्रक्रिया, बचत गटांना कर्ज वाटप ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी ला भौतिक सुविधा वस्तू पुरवणे इत्यादी अशी विविध विकास कामे करून गावच्या विकासाचा चेहरामोहरा एल. एन .टी.च्या कंपनीचा या सी. आर. एस.फंडातून नॅशनल ऍग्रो फाउंडेशनने बदलण्याचे काम केले आहे.

To Top