बाजारवाडीची डॅा.पूजा शिंदे देशात सातवी.

Maharashtra varta

 बाजारवाडीची डॅा.पूजा शिंदे देशात सातवी.










भोर (प्रतिनिधी)

एम्स या देशपातळीवरील एमडीएस प्रवेश परीक्षेमध्ये डॅा.पूजा शिंदे  राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भिमराव शिंदे यांची कन्या बाजारवाडी ता.भोर येथील खेड्यातील मुलीने अथक परिश्रमाने देशात सातव्या क्रमांकाने 99.9 परसेंटेजने उत्तीर्ण होऊन दिल्ली येथील एम्स हे नामांकित कॅालेज मिळविले आहे.एमडी एस परीक्षेस   चाळीस हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते .त्यात डॉ. पूजा शिंदे हिने देशात सातवा क्रमांक मिळवला आहे



डॅा.पूजा हिने गव्हर्मेंट डेंटल कॅालेज मुंबई येथून बीडीएस ही पदवी घेतली आहे.लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिवान असल्याने इयत्ता दहावीमध्ये ९६.५५% मार्क मिळवून त्या भोर तालुक्यात पहिल्या आल्या होत्या.त्या कराटेच्या ब्लॅकबेल्ट असून उत्कृष्ट चित्रकार,उत्कृष्ट भाषण कौशल्य असलेल्या सर्वगुणसंपन्न अशा आहेत.

पूजा चे आई-वडील दोघेही जिल्हा परिषद पुणे येथील भोर तालुक्यात प्राथमिक शिक्षक असून वडिलांना म्हणजे भीमराव शिंदे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. पूजा हिने मिळविलेल्या  यशाबद्दल महाराष्ट्र राज्यातून,भोर तालुक्यातून सर्वच  क्षेत्रातील मान्यवरांनी ,शिक्षक संघटना ,शिक्षक बंधू भगिनींनी तिचे अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

To Top