राष्ट्रवादी मध्ये गणेश निगडे यांचा जाहीर प्रवेश.
भोर तालुका भाजपाला खिंडार,
भोर (वार्ताहर)
भोर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला खिंडार पडण्यास सुरूवात झाली.भोर तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समिती,भोर चे मा. सदस्य यांनी ५० हून अधिक कार्यकर्त्तेसह राष्ट्रवादी काॕग्रेस मध्ये खासदार सुप्रिया सूळे यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.
महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण गणपती लाड व पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा.जयंत दिनकर आसगांवकर यांच्या प्रचारार्थ भोर वेल्हाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नसरापूर (ता.भोर) शुक्रवारी दि.२७ रोजी सकाळी ११.३० घेण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत भोर तालुका भाजपा माजी अध्याक्ष गणेश निगडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
त्यावेळी बोलताना गणेश निगडे म्हणाले. भाजप पक्षातील घुसमट व अंतर्गत कलहमुळे पक्ष सोडला. भाजपा मध्ये प्रवेश करताना व आता पक्षातील परिस्थितीमध्ये मोठी तफावत आहे.आगामी काळात भाजपाचे अनेक कार्यकर्त्ते राष्ट्रवादी काॕग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाची ग्रामीण भागातील नाळ व विकासकामांची झपाट्यामुळे मी राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी गणेश निगडे यांच्या समेवत देवीदास धुमाळ , अंकुश मोरे , हरिचंद्र आहिरे , किशोर मोरे , विश्वास कदम , मेघराज सोनवणे , अक्षय गाडे , लक्ष्मण गायकवाड , नामदेव बुधे , काळुराम भंगे , माऊली राऊत, महादेव सुर्वे आदीसह राष्ट्रवादी काॕग्रेस मध्ये प्रवेश केला.
गणेश निगडे यांनी भा.ज.प.पक्षाची ची भोर तालुक्यात पक्ष वाढीचे काम चांगले केले होते. पक्ष व कार्यकर्ते यांचे संघटन सुयोग्य बांधण्याचा अनुभव आहे. निगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भोंगवली गणात राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले.

