नातेपुते येथे पारंपरिक पद्धतीने काकड आरती सांगता.
नातेपुते : प्रतिनिधी
नातेपुते येथील मुख्य असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये काकड आरतीचा कार्यक्रम सुरु होता .या काकडआरतीला भजनी मंडळ महिलाभगिनी भाविक येत असून हरिनामाच्या गजरात भाविक लोक न्हाऊन निघत होते. नातेपुते मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येथील श्री विठ्ठल मंदिरात काकड आरतीचा कार्यक्रम सुरु आहे. दररोज पहाटे सहा वाजता मंदिरातील भगवान विठ्ठल रखुमाईच्या अभिषेक व काकडा आरती असा भक्तिमय सोहळा पारंपरिक पद्धतीने सुरु होता. नातेपुते येथील भजनी मंडळाच्या वतीने कार्यक्रम संपन्न होतो होता .वारकरी सांप्रदायामध्ये काकडारतीला फार पूर्वीपासून महत्व आहे .यामध्ये पहिल्या मालिका पासून वासुदेव आंधळा पांगुळा, मुका, बहिरा, काकडारती ,गौळणी, अभंगासह आरती गायली जात होती .महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये काकडारती सुरु असतें.
या सर्व धार्मिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय आनंदीमय होत. या सर्व कार्यक्रमात महिला वर्ग भजनी मंडळ तरुणाचा सहभाग असतो. दररोज येथील भाविकांच्या वतीने मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादाचे देखील वाटप अत्यंत भक्तिभावाने होत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून नातेपुते भजनी मंडळाने ही प्रथा सुरु ठेवली असून ऐन थंडीत देखील भाविक मोजक्या संख्येने काकडा आरतीस मंदिरात येत होते, अशी माहिती भजनी मंडळाचे मार्गदर्शक चंद्रकांत तात्या ठोंबरे ,विनायकराव उराडे, साहेबराव देशमुख, गजानन म्हमाणे,, अभिजीत म्हामणे, तुकाराम ठोंबरे ,लक्ष्मण पिगळे भागवत चांगण नारायण चांगण, दिपक पिसे, तानाजी डोळस, जगन्नाथ सोनवळ ,सुदाम एकळ व गावातील उपस्थिती भजनी मंडळ यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेदिवशी मंदिरामध्ये आकर्षक दिव्याची रोषणाई उत्कृष्ठ रांगोळीनी व प्रसादाने झाली .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात येत होते.

