विनायक उराडे यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.

Maharashtra varta

 विनायक उराडे यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव. 




नातेपुते प्रतिनिधी-

            नातेपुते येथील विनायकराव उराडे असून  सर्व धर्म समभाव असा एक दिलदारपणा आपुलकी सेवाभावी वृत्ती दयाळूपणा ,स्पष्टवक्तेपणा ,सच्चाई अंगीकृत विनायकराव उराडे  यांच्याकडे आहे. ते लहानमोठ्या थोर असु द्या, त्यांना प्रचंड आदर देतात. सामाजिक शैक्षणीक राजकीय  आध्यात्मिक धार्मिक कामात सतत कार्यरत असणारे आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत पाईक वारकरी सांप्रदयावर प्रेम करणारे सेवाभावी नेतृत्व विनायकराव यांना संस्काराचे बाळकडू  आपल्या आई वडिल व चुलते कर्मयोगी रघुनाथशेठ उराडे बापू  यांच्या पासून मिळाले.  


चांगले करता आले नाहीतर वाईट तरी करू नये, ही शिकवण विनायकजी यांना आई वडिलांनी दिली. आपले कर्तव्य समजून रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे, हे त्यांचे गुण आहेत. माणुसकी जपणे हेच कर्तव्य समजून कार्य करीत आहेत. लहानथोरांना आपला मित्र समजून मान देतात. आई व  आपल्या कुटुंबा सोबत राहून शेती करून उदरनिर्वाह करीत असताना एखाद्याचे दुःख वेदना  नैसर्गिक आपत्तीमध्ये आपले कर्तव्य समजून सर्वांना मदत करतात. सुखी दुखी प्रसंगात वेळेला धावून जातात .नातेपुते  गावात त्यांच्या वडिलांनी सुरुवात केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह पुढे त्यांनी सर्वच्या सहकार्याने चालू ठेवला आहे. व सर्व जयंती उत्सव महोत्सव गावांचे सर्वच कामात अग्रभागी  असतात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत  किर्तनकाराचे यांच्या कडे येणे जाणे आहे व त्यांच्या सतत संपर्कात असतात. विविध  संस्थेवर मार्गदर्शक म्हणून काम पाहीले आहे .हाच मोठा आनंद वाटतो अशी भूमिका विनायकराव  यांची असते. सर्व बंधु भावाचे कुटुंब हेच आपले कुटुंब समजतात. त्यामुळे ते इतरांचे कुटुंब हे आपले कुटुंब समजून मिळून मिसळून राहतात. राजकारणा पलीकडील व्यक्तीमत्व त्यामुळे माणुसकीचे दर्शन विनायकराव यांच्या कडे पाहील्याने होते. ते विविध ठिकाणी कार्यक्रमात भाग घेऊन आपले कर्तव्य बजावतात, त्यामुळे  विनायकराव उराडे  प्रत्येकाच्या मना मनात कुटुंबात वात्सल्य म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव व आशिर्वाद नातेपुते परिसरातील सर्व  स्तरातील नागरिकांनी ग्रामस्थांनी  दिले.

 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, 

माझिया सकळा हरीच्या दासा,

To Top