महाविकास आघाडीचे उमेदवार सहजपणे निवडणूक जिंकतील:-खासदार सुप्रिया सुळे.
नसरापूर (प्रतिनिधी):-
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार 1 वर्षांपासून राज्यात आहे. हे सरकार स्थिर असून राज्यात धोरणात्मक निर्णय घेत आहेत.महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भक्कम आणि मजबूत आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सहजपणे निवडणूक जिंकतील ,असे आत्मविश्वासरुपी प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ, विधान परिषद निवडणूक 2020, महाविकास आघाडी भोर ,वेल्हा कार्यकर्ता मेळावा नसरापूर ता. भोर येथील कुंभारकर मंगल कार्यालयात संपन्न झाला.त्या वेळी खासदार सुळे बोलत होत्या.
यावेळेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे,माऊली शिंदे, गणेश निगडे,संतोष रेणुसे,शैलेश वालगुडेयांची मनोगते झाली.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, संतोष रेणुसे,चंद्रकांत बाठे,भालचंद्र जगताप ,भोर वेल्हा मुळशीचे युवा नेते विक्रम खुटवड,पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे,किरण राऊत ,प्रमोद लोहकरे,श्रीधर किंद्रे,दमयंती जाधव,सोमनाथ सोमाणी,माऊली शिंदे,लहू नाना शेलार ,गणेश खुटवड,स्वप्नील कोंडे ,आदित्य बोरगे,हमीद मुलाणी आदी पदाधिकारी व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी केले.तर सूत्रसंचालन गणेश खुटवड यांनी केले.

