संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघास सरकारची मान्यता.
मुबंई ( प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटना यापूर्वी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत होत्या, मागील वर्षी शासनाने सर्व संघटनांना श्रमिक कायद्याअंतर्गत कामगार आयुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारक केले होते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात व राजाराम वरुटे अशे दोन प्रस्ताव दाखल झाले होते, राज्यातील शिक्षकांचे पाठबळ अधिकृतपणे संभाजीराव थोरात यांच्या पाठीशी असल्याचे अनेक अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.
कामगार आयुक्त कार्यालयाने संभाजीराव थोरात, बाळकृष्ण तांबरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीची श्रमिक संघ अधिनियम अंतर्गत अधिकृत नोंदणी करून पी.एन. ४९५३ या क्रमांकाची मान्यता दिली असून राजाराम वरुटे यांना त्यांच्या संघटनेचे नाव बदलून देण्यासाठी नोटीस बजावली आहे.अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष तांबारे यांनी दिली.
अखेर संघटना ही लोकमतावर चालते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे ,अखेर लोकशाहीचा विजय झाला असल्याचे असे सूचक विधान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी "न्यूज वार्ताशी" बोलताना व्यक्त केले.

