भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुणे (विशेष प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, परिवर्तनाचे अग्रदूत,प्रचंड विद्याव्यासंगी,समतेचे उदगाते, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन ( ६ डिसेंबर) यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार लेखनातून मांडून त्यांना दिलेली ही मानवंदना .
डॉ . बाबासाहेब म्हणतात "स्वबुद्धीने व्यक्तीने स्वतःचे जीवन स्वतः जगले पाहिजे.त्यासाठी स्वतःची विवेकबुद्धी अधिक परिपक्व करण्याच्या प्रक्रियेने अधिक अंतर्मुख होऊन अंतःकरणामध्ये सद्गुणांची वाढ केली पाहिजे."
ते म्हणतात " आत्मशक्ती ही अविनाशी व शाश्वत स्वरूपाची असते ती प्रत्येक व्यक्तीत स्थित असते परंतु त्या शक्तीला जागृत करावे लागते.बुद्धिकेंद्र हे शरीररूपी प्रयोगशाळेचे प्रमुख केंद्र आहे.आपल्या बुद्धीवर नियंत्रण असणारे लोकच जीवनात यशस्वी ठरतात."
डॉ .बाबासाहेबांच्या मते, 'दिव्यातील वात जळते तेंव्हाच ती अंधःकार नष्ट करून प्रकाश देऊ शकते. म्हणजे "कुणास जळणे, हे त्यागाचे तत्त्व अंगीकृत केल्यावरच कुणास प्रकाश" प्राप्त होऊ शकतो. या तत्त्वाचे जे जीवनात आचरण करतात, त्यांनाच यशस्वीतेची पाऊलवाट कळू शकते.'
आपल्या अंतकरणात दया, क्षमा,शांती, उदारता आणि दातृत्व भाव असला पाहिजे.शिक्षणाविषयी विचार मांडताना डॉ, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "शिक्षण आत्मजाणीव देते .शिक्षण नसेल तर सारा समाज अविद्येच्या अंधारात चाचपडत राहील". शिक्षणाचं महत्व जाणारा हा पोरं जातीयतेमुळे वर्गाच्या बाहेर बसून शिकला .आणि पुढे भारत देशाचे संविधान लिहू शकला. इतकी प्रचंड ताकद शिक्षणात आहे .
या युगपुरुषास पत्नी रमाई यांची मोलाची साथ लाभली. बाबासाहेबांच्या कार्यात रमाईचा खूप मोठा त्याग आहे बाबासाहेबांकरिता रमाईने अनेक कष्ट सहन केले. यातना भोगल्या.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले .यानंतर निर्माण झालेली एक भयानक पोकळी निर्माण झाली. कवी वामनदादा कर्डक यांनाही ही पोकळी सतावते, तेंव्हा ते गीतातून म्हणतात
"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते.
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे ,करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते".
अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
_____________________________
लेखन :-
रावसाहेब बंडा शितोळे
पदवीधर शिक्षक.
जि. प.प्राथ. शाळा उंबरे ता. भोर जि. पुणे
मो. नं.9284503291