भोर नगरपरिषदेने महापरिनिर्वाण दिनी सहकार्य करावे:-रिपब्लिकन सेनेची मागणी.
भोर शहर (प्रतिनिधी)
दि. 6 डिसेंबर 2020 रोजी विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरपरिषदेत साफसफाई रंगरंगोटी, पाणी, मंडप, डेकोरेशन इत्यादी व्यवस्था करणे बाबतचे निवेदन रिपब्लिकन सेना सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका अध्यक्ष सुरेश उर्फ सतीश अडसूळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की, भोर तालुक्यातील अनेक बहुजन समाज बंधू-भगिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचारांना स्मृतींना अभिवादन करण्यात येत असतात. त्यासाठी भोर नगर परिषद या नात्याने साफसफाई, रंगरंगोटी, पाणी मंडप ,डेकोरेशन इत्यादी व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.
यावेळेस भोर ,वेल्हा, मुळशी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर अमोलिक म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आदर्श ,प्रेरक राज्यघटना दिली असे राज्य घटनेचे शिल्पकार,महामानव आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आम्ही या निमित्ताने उजाळा देऊन त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत. यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे .
यावेळेस भोर तालुका उपाध्यक्ष मेघराज रजपूत, भोर शहर महिला अध्यक्ष नजमा काझी उपस्थित होते.