हरिश्चंद्री फाट्यावर पुन्हा अपघात.

Maharashtra varta

 हरिश्चंद्री फाट्यावर पुन्हा अपघात.



 कापूरहोळ ( प्रतिनिधी)

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले हरिश्चंद्री येथे अपघाताचे सत्र सुरू असताना दि. 27 डिसेंबर 2020 रोजी दुपारी फिगो कंपनीची चार चाकी गाडी क्र. GA-08-F 3695 या गाडीचा अचानक टायर फुटल्याने या गाडीला शेजारून जाणाऱ्या ट्रकचा धक्का लागल्याने फिगो गाडीचा तोल सुटल्याने बाजूस जाणाऱ्या  दुचाकीला जोरदार  धडक बसून दुचाकीस्वार गंभीर  जखमी झाला. तातडीने त्यांना इस्पितळात हलविण्यात आले. 

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे रखडलेले काम, रस्त्यात खड्डे तसेच दिशादर्शक फलकाचा अभाव,  आदी विविध कारणांमुळे हरिश्चंद्री हद्दीमध्ये एक ना एक अपघात घडताना दिसत आहेत.

यावेळी सागर पाचकाळे ,राम गाडे, शुभम गाडे, किशोर गाडे, मारुती गाडे सोपान गाडे, संतोष गाडे, नवनाथ आबा गाडे ,दिवानजी पाचकाळे, संदेश गाडे व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

To Top