महिलांच्या स्वयंरोजगार आत आर्थिक मदतीची गरज:- भाग्यश्री मॅडम.
ऑरलिकॉन मेटको व नॅशनल ऍग्रो फाउंडेशन चेन्नई यांच्या वतीने महिलांना धनादेशाचे वाटप.
वेल्हे (प्रतिनिधी):-
भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यातील महिला स्वयंपूर्ण झाल्याशिवाय ग्राम उन्नतीचे स्वप्न साकार होणार नाही .त्यासाठी महिलांना स्वयंरोजगार निर्मिती करून त्यांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन ऑरलिकॉन मेटकोच्या भाग्यश्री मॅडम यांनी केले.
ऑरलिकॉन मेटको व नॅशनल ऍग्रो फाउंडेशन चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने करंजावणे येथे आडवली, आस्कवडी, कोदवडी ,करंजावणे या चार गावातील महिलांना लघु व्यवसाय साठी आर्थिक धनादेश देण्यात आले.त्यावेळेस त्या बोलत होत्या.आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 20 महिलांना नॅशनल ऍग्रो फाउंडेशन व ऑरलिकॉन मेटको यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.
यावेळी ऑरलिकॉन मेटको चे भाग्यश्री मॅडम, जोशी सर, विजय सर यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आले.नॅशनल ऍग्रो फाउंडेशन कडून शशीथरण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चव्हाण यांनी केले.