मतदान अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडाव्यात :- तहसीलदार अजित पाटील.
मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण भोर येथे संपन्न.
भोर ( प्रतिनिधी)
राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या नियम व सूचना प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज व्हावे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना सोपवलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात असे आवाहन भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 -21 मतदान अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक व प्रशिक्षण दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी अभिजीत मंगल कार्यालय महाड नाका भोर येथे सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत संपन्न झाले.
भोर तालुक्यातील एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदाना करीता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1,2,3 यांची यावेळेस नियुक्ती करण्यात आली.
या प्रशिक्षणात केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. निवडणूक विषय कायदेशीर तरतुदी, आदर्श मतदान केंद्र रचना, मतदान कक्ष साहित्य वाटप व कृती बॅलेट व कंट्रोल मशीन आदि बाबी ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या सहाय्याने पी पी टी द्वारा प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.
(मतदान कसे करायचे याबाबतचे बॅलेट व कंट्रोल चे प्रात्यक्षिक कामी भोरचे नायब तहसीलदार मनोहर पाटील, संदीप राव शेळके,के.के पाटील, सचिन देवकर ,योगेश मानकर, सुधाकर सोनवणे, प्रमोद खोपडे ,बापू जाधव, जे. डी. बरकडे बी.के .शिंदे रवी मनाळे,आर बी गाडे यांची मदत झाली.)