शिक्षकांचे संपर्कात येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची कोरोना टेस्ट करण्याची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.

Maharashtra varta

 शिक्षकांचे संपर्कात येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची देखील कोरोना टेस्ट करण्याची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मागणी....





सासवड( प्रतिनिधी)

 पुणे जिल्ह्यातील  पुरंदर तालुक्या मध्ये  राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्राथमिक शाळेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना(पहिली ते सातवी) ऑनलाईन,ऑफलाईन शिक्षण देण्याचे नियोजन सुरु आहे.त्यामध्ये राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून सर्व काळजी घेवून सेनिटायझर,मास्कचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना याच तालुक्यातील 25 प्राथमिक शिक्षकांचा  कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने शिक्षक पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याची असून शिक्षकांचे संपर्कात येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची देखील कोरोना टेस्ट करण्याची मागणी  पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम व सरचिटणीस नंदकुमार चव्हाण यांनी "न्यूज वार्ता" शी बोलताना केली आहे.


काही ठिकाणी स्वयंप्रेरणेने शिक्षक विद्यार्थ्यांना ऑफलाईन (ज्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही त्यामुळे असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेवू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे)शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये दररोज ५० % शिक्षक उपस्थित राहून शालेय कामकाजा बरोबर विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत आहेत. मात्र काही ठिकाणी पालकांचे व प्रशासनाचे समन्वयातून विद्यार्थ्यांना एकत्र करुन अभ्यास देणे अभ्यास तपासणे तर काही शंका प्रश्न असतील तर त्या संबंधात मार्गदर्शन तथा शिकवण्याचे देखील काम सुरु आहे.

त्यामुळे शिक्षकांचा संपर्क विद्यार्थी व पालकांशी देखील येतो असे गृहीत धरून पुरंदरच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना covid चाचणी टेस्ट करण्यासाठी आवाहन केले आहे.

त्यानुसार दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी पुरंदरमधील शंभर ते सव्वाशे शिक्षकांनी कोरोनाची टेस्ट सरकारी रुग्णालयात जावून केली. त्यामध्ये सुमारे २० ते २५ प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. 

यामधील काही शिक्षकांना कसलीही लक्षणे नसताना देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तर काही शिक्षक पती-पत्नी या दोघांतील देखील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह व एकाची निगेटिव्ह आलेली आहे.

वास्तविक पाहता ज्या व्यक्तीला कसलीही लक्षणे दिसत नसताना देखील आपण स्वतःहून कोरोना टेस्ट करायला गेले तर यापूर्वीदेखील अनेक जणांना लक्षणे नसतानादेखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत.

परंतू अधिकृत चाचणीत जर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर संबंधित शिक्षक त्याचे कुटुंबीय त्यांचे संपर्कात येणारे पालक,विद्यार्थी मित्र परिवार अचानक हवालदिल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

 

 आत्ताच अचानक शिक्षकांच्या टेस्ट करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केल्यामुळे सर्वच शिक्षक कोरोना टेस्ट करत आहेत. व त्यामध्ये अनेक शिक्षक पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या संपर्कात आलेले सर्व व उर्वरित सर्वांनी तपासणी करून घ्यावी अशा देखील प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे ज्या गावातील प्राथमिक शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्या गावातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे संपर्क आलेल्या सर्वांशी कोरोना टेस्ट होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची आहे.

   याबाबत प्रशासनाने देखील शिक्षकांना सहकार्य करावे म्हणजे उरलेले शिक्षक  पॉझिटिव्ह येणार नाहीत.

 ज्या ज्या गावातील शिक्षकांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या त्या गावातील इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस अन्य कोणाशी संपर्क न ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने द्याव्यात.

ज्याप्रमाणे शिक्षकांकडून संपर्क येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होवू शकतो. त्याप्रमाणे शाळेमध्ये संपर्क येणाऱ्या विद्यार्थी  व पालकांमुळे देखील उरलेल्या शिक्षकांना प्रादुर्भाव होऊ शकतो. तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी शाळेत जाणाऱ्या शिक्षकांप्रमाणे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील कोरोना टेस्ट करण्याची मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात येत आहे. 

त्या पद्धतीने संबंधित गावातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कातील आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची व संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी टेस्ट करण्याचे नियोजन व्हावे. तोपर्यंत संबंधित गावातील इतर शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये ही नम्र विनंती पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

To Top