ग्राहक पंचायत वेल्हे तालुका अध्यक्षपदी किरण भदे .
नसरापूर (प्रतिनिधी):-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत वेल्हे तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सकाळ'च्या माध्यमातून भोर आणि वेल्हे तालुक्यात उत्कृष्ट वार्तांकन व सामाजिक प्रबोधनात्मक काम करणारे आदर्श पत्रकार किरण भदे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच पुणे जिल्ह्यात विविध तालुका अध्यक्षांची यावेळेस निवड करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्य संघटक बाळासाहेब औटी, महिला अध्यक्ष उर्मिला येळगावकर, रमेश टाकळकर ,दिलीपराव फडके दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते .पुणे जिल्हा महिला संघटक पदी खडकी तालुका भोर येथील सरपंच छाया नामदेव बांदल व संघटकपदी नथू वालगुडे यांची निवड करण्यात आली.
ग्राहक पंचायत वेल्हे तालुका अध्यक्षपदी किरण भदे यांची सुयोग्य निवड करण्यात आल्याबद्दल भोर, वेल्हे तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होऊन त्यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे .