कृषी कायद्याविरोधात प्रहार'चे मुंबईत अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा.
मुंबई (प्रतिनिधी):-
कृषी कायद्याविरोधात प्रहार'चे मुंबईत अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दि. २२ रोजी मुंबईत झालेले आंदोलन , प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने तसेच पक्ष कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनात व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अजय महाराज बारस्कर यांच्या दिशा निर्देशानुसार ,प्रहार किसान आंदोलनात पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष चे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी जो सक्रिय सहभाग घेत ,भारत देशातील शेतकरी वर्गाला संदेश दिला की, आम्ही तुमच्या सोबत आहोत , ही लढाई आपली सर्वांची आहे हे दाखवून दिले. आणि पुण्यातील कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित झाले.
त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा प्रमुख संघटक नीरज कडू , अभितीत सकट , पुणे जिल्हा कार्यध्यक्ष , ऍड अनंतराव काळे ( जिल्हाध्यक्ष - प्रहार वकील असोशियशन ) विजय भाऊ तापकीर ( जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी ) पंकज भाऊ बगाडे ( जिल्हा कार्याध्यक्ष कामगार ) प्रल्हाद कडू जिल्हाध्यक्ष सुरक्षारक्षक ,सौ . पुनमताई बाळासाहेब तावरे ( जिल्हा अध्यक्षा महिला ब्रिगेड ) , सुनील गोरे पुणे शहर अध्यक्ष , रोहित भोसले प्रहार पुणे शहर उपाध्यक्ष महेश कणकुरे , हवेली ,तालुका अध्यक्ष संतोष भाऊ कबाडी तालुक्का अध्यक्ष जुन्नर , बापू दादाभाऊ नवले तालुका अध्यक्ष ,शिरूर ,संतोष मोहिते तालुका अध्यक्ष भोर , संजय राऊत तालुका अध्यक्ष इंदापूर , रमेश शितोळे तालुका अध्यक्ष दौंड, भारत आण्णा रांजणे तालुका अध्यक्ष वेल्हा , राम भाऊ कुकडे सरचिटणीस पिंपरी चिंचवड , संदीप नवले सरचिटणीस पुणे , अकबर भाई शेख रिक्षा संघटना अध्यक्ष ,मेहबूब भाई शेख कॉन्ट्रॅमेंट कार्याध्यक्ष , गौरव शिंदे हवेली अध्यक्ष कामगार , प्रमोद खुळे अध्यक्ष पिंपरी चिंचवड कामगार , गणेश भाऊ फुरसुले उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड , चंद्रकांत उदगीर पिंपरी चिंचवड चिटणीस ,सौ उदगीर ताई महिला आघाडी पिंपरी चिंचवड सचिव ,सौ .कमिनीताई ताकवले तालुक्का अध्यक्ष हवेली महिला ब्रिगेड ,मीनाताई धोतरे पुणे शहर महिला अध्यक्षा , सौ . निर्मलाताई गुप्तेदार महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड ,छाया ताई बागुल , बाळासाहेब तावरे , पुणे जिल्हा कार्यकारी , अनिल मोहिते इंदापूर शहर अध्यक्ष , कल्याणकर अवसरे सर हवेली तालुक्का अध्यक्ष शिक्षक / शिक्षकेत्तर संघटना व शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 30 शेतकरी शहीद झाले, तरीही सरकारला जाग आली नाही,व अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्या, यासाठी आंदोलन करण्यात आले ,म्हणून मुंबई येथे उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालय बी. के. सी. बांद्रा मुंबई येथून मोर्चास सुरुवात झाली. पोलिसांनी मोर्चा अडविला, पुढे त्याचे रूपांतर सभेत झाले.
या मोर्चात राज्यभरातून प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ,जयंत पाटील ,बाबा आढाव ,खंडू भाऊ,प्रतिभा शिंदे, आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.