विरवाडी ,दिडघरचे उपसरपंचपदी विशाल शिळीमकर.

Maharashtra varta

 विरवाडी ,दिडघरचे उपसरपंचपदी विशाल शिळीमकर.



नसरापूर (प्रतिनिधी)

विरवाडी ,दिडघर,केतकावणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी 'विशाल शिळीमकर' यांची बिनविरोध निवड झाली.


 त्यावेळेस "न्यूज वार्ता" शी बोलताना विशाल शिळीमकर म्हणाले की,मला मिळालेले उपसरपंच पद हे गावचा आदर्श विकास करण्यासाठी पदाचा पूर्णपणे वापर करून वीरवाडी दीडघर,केतकावणे  या गावांमध्ये मोठी विकास कामे करणार असून लवकरात लवकर नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन वीरवाडी ,दिडघर केतकावणे ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल शिळीमकर यांनी केले.


 समीर दिघे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची रिक्त जागा झाली .त्या जागेसाठी तारीख 22 रोजी निवडणूक झाली. यावेळी सरपंच सुनीता सोंडकर ,समीर दिघे ,अमर इंगवले ,सविता सोंडकर, निता शिळीमकर, मंदा  खंडाळकर उपस्थित होते.


 निवडणुकीच्या वेळी उपसरपंच पदासाठी विशाल शिळीमकर यांचा अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक अंकुश लहामटे यांनी शिळीमकर यांना उपसरपंच पदी बिनविरोध घोषित केले .


या  बिनविरोध निवडीसाठी विशेष प्रयत्न मा. सरपंच विजय शिळीमकर, संतोष नाना शिळीमकर,गोकूळ दिघे,भैरू दिघे, समीर शिळीमकर, सचिन अण्णा बांदल, शांताराम दिघे, गणेश काका शिळीमकर आदींनी प्रयत्न केले.



To Top