पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावचे 'समाजसेवक' व्हा.

Maharashtra varta

 पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक 'समाजसेवक' व्हा.



मुंबई (प्रतिनिधी)

पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक 'समाजसेवक' बना.

● गावात वीज आहे का.?

● गावात किती दिवे चालू आहेत.?

● गावात किती दिवे बंद आहेत.?

● गावात रस्ते कसे आहेत.?

● गावात त्यांची डागडुजी होते का.?

● सांडपाणी गटर व्यवस्था आहे का.?

● सार्वजनिक शौचालय आहे का.?

● गावात आठवडा बाजार आहे का.?

● पिण्याच्या पाण्याची सोय आहे का.?

● पाणी मुबलक सर्वांना मिळते का.?

● घरोघरी पाण्याचे नळ आहेत का.?

● गावात येणारे पाणी शुद्ध आहे का.?

● गावात शाळेची व्यवस्था आहे का.?

● शाळेसमोर मैदान व गार्डन आहे का.?

● गावात समाज मंदिर आहे का.?

● गावात व्यायाम शाळा आहे का.?

● ती व्यायाम शाळा कार्यरत आहे का.?

● गावातील रस्ते कसे आहेत.?

● गावाचे ध्येय धोरण काय आहे.?

● ते आपण सर्व पाळतो का.?

● मुलांना लसीकरण वेळेवर होते का.?

● गावात दवाखाना आहे का.?

● आरोग्य विषयक शिबिरे घेतात का.?

● सांस्कृतिक कार्यक्रम होतात का.?

● गरीब मुलांचे शिक्षण कसे होते.?

● त्यांच्यासाठी काय प्रयोजन आहे.?

● जेष्ठ नागरिकांचा सन्मान होतो का.?

● अकस्मात घटनेत मदत मिळते का.? 

● कार्यासाठी सर्व एकत्र येतात का.?

● गावात सरपंचाचे लक्ष आहे.?

● ग्रामसेवक योजना आणतात का.?

● नागरिकाला त्याचा फायदा होतो का.?


👉 गाव ही संघटना नाही. गाव हा पक्ष नाही, गाव हे मानवतेचे महान मंदिर आहे, जेथे एकोपा जोपासला जातो.

👉 मी कार्यकर्ता नाही, समाजाचा एक प्रमुख घटक आहे.

👉 माझे कर्तव्य हे असेल माझा गाव माझा स्वर्ग आहे, तो स्वर्गच राहण्यासाठी मी माणूस म्हणून कधी या गोष्टींचा विचार केला का..?


मग विचार करा, नक्की बदल घडेल.

पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक 'समाजसेवक' व्हा.

गाव बिनविरोध करून नवीन इतिहास घडविला पाहिजे.

To Top