No title

Maharashtra varta

 संपतराव जेधे यांनी अखेरपर्यंत मला साथ दिली :-शरदचंद्रजी  पवार.



भोर (प्रतिनिधी):-

१९७८ साली संपतराव माझ्यासोबतच आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतराव जेधे यांचे  स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली अशा  संवेदना शरचंद्रजी पवार यांनी व्यक्त केल्या .


भोर-वेल्हा तालुक्याचे मा.आमदार व श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समिती-पंढरपूर चे विश्वस्त,,स्व.संपतराव जेधे (आण्णा) यांचे  वृद्धापकाळाने दुख:द निधन झाले.ही बातमी समजताच दि.16 डिसेंबर 2020 रोजी  शरदचंद्रजी पवार साहेबांनी आंबवडे(ता.भोर, जि.पुणे) येथे येऊन जेधे परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. शोक सभा प्रसंगी शरदचंद्रजी पवार यांनी सहवेदना व्यक्त करत त्यांच्या आठवणीस व कार्यास उजाळा दिला.


शरचंद्रजी पवार पुढे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की,संपतरावांनी तत्कालीन सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. अशी निस्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात, संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन.


यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  भालचंद्र जगताप ,आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे,भोर ,वेल्हा मुळशीचे युवा नेते विक्रम खुटवड,मा. उपसभापती मानसिंगराव धुमाळ,  जेधे यांचे पुत्र सरपंच रोहिदास जेधे ,पुण्याचे मा. महापौर अंकुश काकडे ,रवींद्र बांदल ,भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे,भोर शहराध्यक्ष नितीन धारणे, मा. नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,भोर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गणेश खुटवड ,मेघराज जेधे आदी उपस्थित होते.

To Top