२० डिसेंबरला 'टोल नाका हटाव कृती समिती'ची केळवडे येथे होणार ,महत्वाची बैठक
पुणे( प्रतिनिधी)
दि. २० डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता डाॅ. संजय जगताप यांचे केळवडे येथील हाॅटेल चिंतामणी येथे टोल नाका हटाव कृती समितीची बैठक आयोजित केली असुन सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे.लढाई संपलेली नाही, असे विचार माऊली दारवटकर(शिवापुर टोल नाका हटाव कृती समिती)व सचिन बदक (सदस्य - शिवापुर टोल नाका हटाव कृती समिती) यांनी मांडले.
शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने आज दि.18 डिसेंबर 2020 रोजी पुण्याचे मा.जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले. या वेळी त्यांच्या सोबत टोल नाका हटाव कृती समिती सदस्यांबरोबर सविस्तर चर्चा झाली.
१ जानेवारी,२०२१ पासून फास्ट टॅग सक्तीचा केला जात आहे. त्याचा फायदा उठवत MH-12 व MH-14 च्या वाहनांच्या माथी टोल मारू नये. आम्हाला स्वतंत्र 4 मार्गीका द्याव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. असा इशारा टोल नाका हटाव कृती समितीने दिला .
१६ फेब्रुवारी २०२० रोजी हा टोलनाका भोर हद्दीच्या पलीकडे हटवण्यासाठी आंदोलन झाले होते. जो पर्यंत टोलनाका स्थलांतरीत होत नाही, तो पर्यंत MH-12 व MH-14 ची वाहने टोल भरणार नाहीत. टोलनाका स्थलांतराची कार्यवाहीची तात्काळ सुरूवात करावी. ठेकेदाराच्या भल्यासाठीच NHAI सतत अर्धवट कामांना पाठीशी घालत आहे. १००० च्या वर मृत्यू या महामार्गावर झाले आहेत. जबाबदार आधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी स्पष्ट भुमिका टोल नाका हटाव कृती समितीने मांडली आहे.