मुकादम वकिलांमुळे 'गोरक्षकांना' न्याय मिळाला.
भोर (प्रतिनिधी)
भोरचे वकील विजय मुकादम व त्यांचे चिरंजीव अजिंक्य मुकादम यांनी कोर्टात गोरक्षकांची भक्कम केस मांडून गो रक्षकांच्या बाजूने निकाल झाला.व 14 जनावरांचे प्राण वाचले.
दोन महीन्यांपुर्वी कत्तलीसाठी चाललेल्या तब्बल १४ म्हशींना भोरमध्ये जीवदान मिळाले होते. पण ती केस भोर कोर्टात गेली, व ती जनावरे पुन्हा ज्यांच्या मालकीची होती. त्यांना परत देणे असा निकाल लागला.
तेव्हापासुन त्या मुक्या जनावरांचा प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरु झाली. गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षकांना मार्गदर्शन करत , भोर येथील जेष्ठ व आदर्श वकील आणि सामाजिक कार्य व निस्वार्थीपणे व निष्ठेने करणारे विजय मुकादम व त्यांचे त्यांचे चिरंजीव वकील अजिंक्य मुकादम यांनी गोरक्षक यांची केस घेत सुयोग्य भक्कम बाजू कोर्टात मांडत ,सलग ३ दिवस चाललेल्या या केसमध्ये अथक प्रयत्नांनंतर शेवटी सत्याचा विजय झाला व जनावरांचे मालक तथा जनावरे कत्तली विक्रीस नेणारे या सर्वांचे अर्ज माननीय कोर्टाने फेटाळले . मुक्या जनावरांचे प्राण वाचले.
या सर्व कार्यात भोरमधील असंख्य गोरक्षकांनी खुप मेहनत घेतली. भोर मधील सर्व गोरक्षक हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी आहेत. या कार्यात सहभागी सर्व मान्यवरांचे व शिवपाईक गोरक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.