तिसऱ्यांदा कारवाई झाल्यावर वाहनचालकाचा परवाना रद्द होणार...
खेडशिवापुर (प्रतिनिधी)
आज गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचे सुचनेनुसार आणि मा. अपर पोलीस महासंचालक वाहतूक ,महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाने मुंबई पुणे बेंगलोर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, आज पासून राष्ट्रिय महामार्ग क्रमांक 4 पुणे ते बेंगलोर पर्यंत अवजड वाहनांवर लेन कटिंग केल्यास त्वरित दंड केला जाणार आहे. या ऑपरेशन ला OPRATION ON HYWAY SAFTY असे नाव देण्यात आले असून या मोहिमे अंतर्गत सलग तिसऱ्यांदा कारवाई झाल्यावर वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. पुणे-मुंबई- बेंगलोर या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लेन शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे,
खेड शिवापूर टोलनाका येथे आज पासून कारवाई ला सुरुवात झालेली आहे.अशी माहिती सारोळा महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण रणदिवे यांनी ''न्यूज वार्ताशी" बोलताना दिली.
(अपर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय आणि संजय जाधव( एस पी महामार्ग पुणे) यांचे मार्गदर्शनाने वाहनचालक यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येऊन कारवाईस सुरुवात केली आहे.)