प्रहार ग्राम पंचायत निवडणुका लढणार :-संघटक नीरज कडू
पुणे जिल्हा प्रहार पक्षाची आढावा बैठक संपन्न.
पुणे (प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्ह्यात गावा खेड्यात ,वाड्या, वस्तीवर पोहचला आहे ,त्या अनुषंगाने समाजातील सोशीत ,दुर्बल , अपंग ,कष्टकरी , कामगार ,शेतकरी , दिव्यांग ,अश्या लोकांचे प्रश्न सोडवण्या करिता त्यांचा प्रतिनिधी बनून काम करण्याकरिता ग्राम पंचायत निवडणुका लढणार ,असे पुणे जिल्हा संघटक नीरज कडू यांनी सांगितले.
प्रहार जनशक्ती पक्ष, पुणे जिल्हातील ,सर्व पदाधिकारी यांची जिल्हा आढावा बैठक ,आळंदी देवाची येथे साईराज हॉलमध्ये संपन्न झाली. त्यावेळेस कडू बोलत होते.
त्या मीटिंग मध्ये असे निश्चित करण्यात आले की , प्रहार जनशक्ती पक्ष केंद्राच्या कृषी व कामगार धोरणाला कडाडून विरोध करत आहे .नवीन कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार लादत असून त्याला तीव्र विरोध प्रहार पक्ष करत आहे ,प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ,तसेच महाराष्ट्र राज्याचे नामदार राज्यमंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीला केंद्राच्या कृषी कायद्याला निषेध करायला ,विरोध करायला , व हरियाणा आणि पंजाब च्या शेतकरी बंधूना घेऊन जे आंदोलन केले,त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार च्या वतीने पाठिंबा दिला आहे. याबाबत केंद्र सरकार नमले नाही तर ,प्रहार पक्ष आंदोलन तीव्र करेल. आणि लाखो च्या संख्येने दिल्लीत धडक देईल , तसेच नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात व पक्ष कार्यध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना मंगेश दादा देशमुख, तसेच पक्ष प्रवक्ते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष उतरणार आहे. ज्या ठिकाणी प्रहारची ताकद आहे,त्या ठिकाणी पॅनल टाकून उमेदवार उभे करणार आहे.
या बैठकीला प्रामुख्याने पिंपरी चिंचवड अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राऊत ,पुणे जिल्हा सचिव गणेश भाऊ मराठे ,पुणे जिल्हा अध्यक्ष वकील असोशियशन अनंतराव काळे, , पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी विजय तापकीर ,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कामगार पंकज भाऊ बगाडे ,पुणे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी सौ . पूनम ताई तावरे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव गवारे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष विदयार्थी आघाडीचे शिवराज काळभोर , हवेली तालुक्का अध्यक्ष महेश भाऊ कणकुरे , शिरूर तालुक्का अध्यक्ष बापूसाहेब नवले , इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत , इंदापूर तालुका उपाध्यक्ष शैलेंद्र सोनटक्के , इंदापूर शहर अध्यक्ष अनिल मोहिते , भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते , वेल्हा तालुक्का अध्यक्ष आण्णा रांजणे , खेड तालुक्का अध्यक्ष संभाजी घेनंद ,मावळ ता. अध्यक्ष सुधीर काळे , दौंड प्रभारी मंगेश दादा फाडके , हवेली तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी ची प्रज्वल जवळकर , खेड तालुक्का अध्यक्ष कामगार दौंडकर , पुणे जिल्हा अध्यक्ष सुरक्षा रक्षक सेल प्रल्हाद कडू , पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे , उपाध्यक्ष रोहित भोसले ,सरचिटणीस संदीप नवले ,कार्याध्यक्षा पुणे मीनाताई धोतरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विद्या ताई ठिपसे , हवेली तालुका अध्यक्षा सौ . कमिनीताई ताकवले , पिंपरी चिंचवड अध्यक्षा महिला सौ . निर्मला ताई गुप्तेदार , उपाध्यक्ष श्रीमती छाया ताई बागुल , पिंपरी चिंचवड अध्यक्ष कामगार गौरव दादा शिंदे , वडगाव शेरी अध्यक्ष चंद्रकांत सावंत , पुणे शहर अध्यक्ष कामगार आनंद भाऊ जगताप , वडगाव शेरी उपाध्यक्ष महादेव भोसले , पुणे कॉन्टेमेंट अध्यक्ष आणि बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.