लॅबोरेटरी शुल्क' विरोधात अभाविपचे आक्रमक आंदोलन.

Maharashtra varta

 फर्ग्युसन महाविद्यालयात 'लॅबोरेटरी शुल्क' विरोधात अभाविपचे आक्रमक आंदोलन.


पुणे (प्रतिनिधी)

देशभरात कोविड-१९ च्या महामारी मूळे आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झालेली असतांना, पुणे शहरातील विविध महाविद्यालयात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण केला जात आहे. महाविद्यालयातून निर्माण होणाऱ्या आर्थिक दबावामुळे विद्यार्थी व पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अश्याच प्रकारच्या दबावातून फरगुसन  महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते.

फेर्गुसन महाविद्यालयात एम.एस.सी बायोटेक करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ८४,५००₹ हुन अधिक लॅबोरेटरी फी आकारली जात होती, कॉविड च्या या परिस्थितीत राज्यातील महाविद्यालय अजून ही बंद आहेत तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत होता, फर्गुसन महाविद्यालयात शिकत असणारे विद्यार्थी मागील महिनाभरापासून विविध समस्यांना घेऊन महाविद्यालय प्रशासनापर्यंत संपर्क करत होते व पोहचण्याचा प्रयत्न करीत होते परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कोणत्याच पध्दतीचा प्रतिसाद मिळत नव्हता, याच अनुषंगाने अभाविप पुणे महानगराच्या वतीने फेर्गुसन महाविद्यालयात निवेदन देण्यात आले होते परंतु तरी देखील महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवारण केले नव्हते म्हणून आज अभाविप ने विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत व न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. महाविद्यालयाची फी ४ हप्त्यांमध्ये घ्यावी, महाविद्यालयातील प्रयोगशाळा बंद असल्यामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून प्रयोगशाळेचे शुल्क घेऊ नये, प्रात्यक्षिके चालू झाल्याशिवाय प्रात्यक्षिकांचे शुल्क घेऊ नये, अभ्यासक्रम जर संपूर्ण शिकवला गेला नाही तर शुल्कपरती करण्यात यावी, विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येऊ नये अश्या विविध मागण्यांसाठी अभाविपने आंदोलन केले, यावर फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. 


शुभम भुतकर (महानगर मंत्री, अभाविप पुणे) म्हणाले की," पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. परंतु याच पुणे शहरातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे, लॅबोरेटरी चा वापर होत नसताना शुल्क आकारण्यात येत आहे, कॉरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा ,अन्यथा पुणे शहरातील अश्या प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल "

आंदोलनामध्ये पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर, महानगर सहमंत्री शुभंकर बाचल, दयानंद शिंदे, योगेश्वर राजपुरोहित,रुपल काळेबेरे व प्रसाद आठवले, कोथरूड जिल्हा संयोजक तुषार काहूर, डेक्कन नगर मंत्री अभिजित हुडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top