महेंद्र साळुंके यांचे सामाजिक काम मोठे:- युवानेते पृथ्वीराज संग्रामदादा थोपटे.

Maharashtra varta

 महेंद्र यांचे सामाजिक काम मोठे:-

युवानेते पृथ्वीराजभैया संग्रामदादा थोपटे यांचे प्रतिपादन.



भोर  ( प्रतिनिधी)

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात भीम आर्मी संघटनेचे भोर तालुका अध्यक्ष महेंद्र साळुंखे यांनी लोक उपयोगाची अनेक कामे हाती घेऊन, सामाजिक विकास कामात वेगळे योगदान दिलेले आहे. सामाजिक चळवळी ,सामाजिक आंदोलने यामध्ये त्यांचा कायम हिरीरीने सहभाग असतो .समाजाचे काम  करणाऱ्या व्यक्तीला समाज नेहमी मोठे स्थान देतो,कामातून मोठे व्हा,असे प्रतिपादन भोर तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज संग्राम थोपटे यांनी केले आहे.

१० डिसेंबर रोजी भोर तालुका भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साळुंके  यांच्या  वाढदिवासनिमित्त  प्रमुख पाहुणे युवानेते पृथ्वीराज संग्राम  थोपटे,बोलत होते.

यावेळी युवा नेते प्रदिपभाऊ कांबळे,प्रविण ओव्हाळ,सुनिल गायकवाड ,किशोर अमोलिक,नवनाथ कदम,विनोद गायकवाड ,सतिष अडसूळ,सागर जगताप,शुभम यादव,सुनिल मोरे,स्वप्निल सावंत,सुनिल सावंत ,शंकर यादव,सचिन अडसूळ,महेंद्र रणखांबे,प्रशांत भालेराव,आनंदा सातपुते, राजेंद्र शिंदे,धिरज रायरीकर,सत्यजित बांदल,नवनाथ देशमुख,विश्वजित बांदल,अनिल पवार,विशाल गोरड इत्यादी उपस्थित होते.राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,उद्योग क्षेत्रातीलअनेक मान्यवरांनी  प्रत्यक्ष भेटून,फोनमार्फत फेसबुक,वाँटसअप मार्फत  शुभेच्छा दिल्या.


महेंद्र साळुंखे म्हणाले की,अगदी बालपणीच्या मित्रांपासून ते शाळा,काँलेजमधील अनेक मित्र-मैत्रिणी,नातेवाईक,माझे जिवलग सहकारी यांनी मला विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या,माझा वाढदिवस साजरा केला.तुम्हा सर्वांच्या इतक्या प्रेमाचा,आपुलकीचा मी "धनी" आहे,

To Top