हरिश्चंद्री ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन.

Maharashtra varta

 भुयारी मार्गासाठी हरिश्चंद्री येथे ग्रामस्थांचा शोले स्टाईल आंदोलन.


भुयारी मार्ग होत नसल्याने नागरिक संतप्त.


कापूरहोळ( प्रतिनिधी)

पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री ( ता. भोर) येथील नागरिकांना येण्या- जाण्यासाठी भुयारी मार्गाच्या मागणीकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याने प्रहार संघटना भोर  आणि स्थानिक तरुणांनी ,ग्रामस्थांनी चक्क  गावच्या पिण्याच्या टाकीवरून चढून शोले स्टाईल आंदोलन  दिवसभर व सायंकाळी पर्यंत सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. 


पुणे सातारा महामार्गाचे रुंदीकरण होत असताना चुकीच्या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग झाल्याने हरिश्चंद्री येथे भुयारी मार्गाची झाला नाही. यामुळे रस्त्याच्या पलीकडे जवळपास येथील शेतकऱ्यांची ६५ टक्के शेती असल्याने महामार्गावरून ये-जा करावी लागते. भुयारी मार्ग नसल्याने झालेल्या अपघातात अनेक निष्पाप ग्रामस्थांचे बळी गेले आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. भुयारी मार्ग होण्यासाठी प्रहार संघटनेचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहिते, राम गाडे, राम पाचकाळे, शुभम गाडे, किशोर गाडे, पंकज गाडे, तुषार गाडे, अमित पाचकाळे, सागर घोडके, अजिंक्य पाचकाळे, लकी गाडे आदी ग्रामस्थांचा आंदोलनात सहभाग होता.

एनएचआयचे उपव्यवस्थापक राकेश कोळी, एनएचआय चे अनिल गोरड, बद्रिप्रसाद शर्मा, त्रिवेणीचे श्रीकांत गायकवाड ,सरपंच संध्या गाडे यांच्या उपस्थित घटनास्थळी तातडीने आलेल्या पुणे जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे,चंदू भैय्या परदेशी,भीम आर्मी संघटना अध्यक्ष महेंद्र साळुंखे,रिपब्लिकन सेनेचे सुरेश अडसूळ,किशोर अमोलिक ,प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी जाऊन आंदोलनकर्त्याना समजूत घालून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र टाकीवर चढलेल्या आंदोलकांनी भुयारी मार्ग होण्यासाठी लेखी पत्र तसेच महामार्गावर अपघातात मृत्यू प्रकरणी संबधित अधिकाऱ्यावर जोपर्यत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्या चा पवित्रा घेत उशिरा पर्यंत शोले स्टाईल आंदोलन सुरू होते.

To Top