प्रहार पक्ष भोरच्या वतीने पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार.
नसरापूर (प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्ष ,भोर यांच्या वतीने राजगड पोलीस स्टेशन,नसरापूरचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना "कोव्हीड योद्धा" हा पुरस्कार देण्यात आला.
संपूर्ण जग एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत असताना अशा कठीण परिस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्त रात्रंदिवस ठेवून कोरोना जनजागृती करून समाजाची सेवा उदात्त भावनेने केली.हा त्यांचा आदर्श खरोखरच अनुकरणीय असून प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल, कोव्हीड योद्धा हा पुरस्कार दिले असल्याचे प्रतिपादन भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केले.
राजगड पोलीस स्टेशन,नसरापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला.या वेळेस भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते,राम पाचकाळे,जितेंद्र पाचकाळे यांच्या हस्ते देण्यात आले.