जनसामान्यांचा नेता शरदचंद्रजी पवार साहेब-शिवाजीराव कोंडे यांचे प्रतिपादन.
नसरापूर ( प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा असणारे,लोकांमध्ये आपला माणूस म्हणून वावरणारे, त्याचप्रमाणे जनसामान्यांचे आवडते लोकनेते शरदचंद्र पवार साहेब हे बहुआयामी व्यक्तिमत्व महाराष्ट्राला व आपल्या सामान्य जनतेला लाभले आहेत, हे भाग्य समूळ जनतेने लक्षात घ्यायला हवे असे मत शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर येथे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा.शिवाजीराव कोंडे यांनी पवार साहेबांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मांडले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी जनतेचा आपला माणूस अशी सर्वत्र ख्याती असणारा हा लोकनेता आणि ह्या लोकनेत्याचा मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र आज समृद्ध झालेला आहे होत आहे असे सांगून महाविद्यालय स्तरावर आणि संस्था स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये वृक्षारोपण,योगासने,सायकलिंग,धावणे अशा विविध स्पर्धा आयोजित करणार आहोत, अशी माहिती देऊन शदरचंद्र पवार साहेबांना महाविद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जगदीश शेवते यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सचिन घाडगे यांनी,महेश दळवी,स्वप्नील सरपाले,सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मागर्दर्शनाखाली केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व डॉ.राजेंद्र सरोदे,प्रा.पौर्णिमा कारले, प्रा.सहदेव रोडे,प्रा .जीवन गायकवाड,प्रा.संदीप लांडगे,प्रा.प्रल्हाद ननावरे,प्रा.अमोल पावगे,प्रा.रोशनी पवार,प्रा.अतुल मरेवाड, श्री.विकास ताकवले, आशिष परमार,सागर घोणे उपस्थित होते.