पुणे जिल्हा प्रहारच्या च्या वतीने मोटार सायकल रॅली उत्स्फूर्तपणे संपन्न.

Maharashtra varta

 पुणे जिल्हा प्रहारच्या वतीने  किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात  मोटार सायकल रॅली उत्स्फूर्तपणे संपन्न.


पुणे (प्रतिनिधी)

प्रहार जनशक्ती पक्ष,पुणे जिल्हा यांच्या वतीने पुणे येथे दिल्लीच्या  किसान आंदोलनास पाठींबा देण्यासाठी,राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने दि.9 डिसेंबर रोजी भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे  जिल्ह्यातून विविध तालुक्यातून ,तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथून प्रहारचे अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला भगिनी हजारोंच्या संख्येने दुचाकीसह सहभागी झाले होते.जय जवान, जय किसान, इन्कलाब जिंदाबाद,वंदे मातरम,भारत माता  की जय, शेतकरी माझा आहे,राजा अश्या घोषणांनी पुणे शहराचा आसमंत दणाणून सोडला. जय प्रहार, अपना भिडू ,बच्चू कडू अश्या घोषणा देत प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये एकीची वज्रमुठ घट्ट करत ,उत्साह निर्माण करत, दुचाकी  मोटर सायकल रॅली अधिक वेगवान झाल्याचे चित्र पुण्यात पाहण्यास मिळाले, हजारो प्रहारचे मोटारसायकल स्वारांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला मोठ्या  प्रकारचा पाठिंबा देत,आम्ही तुमच्यासोबत आहे,असे दाखवून दिले आहे.

दिल्लीत  सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन प्रहारचे राज्याचे युवा नेते व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक "गौरवदादा जाधव" यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या मोटारसायकल रॅलीला, पुणे पोलिसांनी  परवानगी नाकारली. तरी देखील गनिमी कावा करीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ,पदाधिकाऱ्यांनी रॅली पूर्ण केली.

 

जिल्हाधिकारी पुणे, यांना दिल्ली येथील किसान मोर्चा पाठिंबा व कृषी कायद्यात बदल करण्याबाबचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले.




To Top