कात्रज ते सारोळा पीएमपीएल बस 12 डिसेंबर पासून सुरू.

Maharashtra varta

 कात्रज ते सारोळा  पीएमपीएल बस 12 डिसेंबर पासून सुरू.



पुणे( प्रतिनिधी)

कात्रज ते सारोळा या मार्गावरील पीएमपीएल बस सेवा 12 डिसेंबर 2020 पासून सुरू होत आहे .या मार्गासाठी एकूण बस संख्या  6 असणार आहे .आणि अर्ध्या -अर्ध्या तासामध्ये बससेवा आहे. तरी प्रवासी नागरिकांनी नोकरदार कामगार तसेच शाळा व कॉलेजचे विद्यार्थी यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे वाहतूक व्यवस्थापन यांनी केलेले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व त्यालगत असणाऱ्या उपनगरातील दैनंदिन व्यवहार खाजगी, व्यावसायिक दुकाने, औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, लघु उद्योग सुरू झाल्यामुळे प्रवासी व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार परिवहन महामंडळाची मर्यादीत बससेवा सुरू करण्यात आली आहे . परिवहन महामंडळाच्या सर्व बस संचलन सुरू झालेले नाही. त्यामुळे बसेस उपलब्ध आहेत. तसेच परिवहन महामंडळाच्या बसेस ताफ्यामध्ये  भाडेतत्वावरील नवीन 466 बसेस दाखल झाले असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाने" न्यूज वार्ताशी"  बोलताना सांगितले.

 पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व त्यालगत असणाऱ्या उपनगरात औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे .तसेच या उपनगरांमध्ये पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्र असल्याने परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करणे बाबत त्या भागातील लोकप्रतिनिधी नोकरदार कामगार तसेच शाळा व कॉलेजचे विद्यार्थी हे अनेक वर्षापासून मागणी करीत आहेत. तसेच माननीय संचालक मंडळाने पी एम आर डी ए च्या हद्दीपर्यंत बस सेवा सुरू करण्यास मान्यता केलेले आहे .

To Top