क्षेत्र माहुलीत बांधकाम कामगार व मजूरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पेटी वितरण

Maharashtra varta

 कामगार व मजुरांचे योगदान महत्वपूर्ण:-मा. उपसभापती साहेबराव जाधव.

क्षेत्र माहुलीत  बांधकाम कामगार व मजूरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पेटी वितरण.





सातारा (प्रतिनिधी)

देशाच्या विकासात प्रत्येक घटकांचे योगदान आहे. त्यातील बांधकाम कामगार व मजूर यांनी परिश्रमामधून स्वतःबरोबर देशाचा विकास साधण्याचे महत्वपुर्ण काम केलेले आहे. कोरोनाच्या महामारीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्यांच्या सुरक्षेबाबत साधने पुरवून त्यांना प्रगतीची दिशा दाखवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सातारा पंचायत समितीचे मा. उपसभापती साहेबराव जाधव यांनी केले.


राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाने व त्यांचे स्वीय सहाय्यक गौरव भाऊ जाधव यांच्या सहकार्याने क्षेत्र माहुली गावातील ७५ बांधकाम कामगार व मजूर बांधवांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पेटी वितरित करण्यात आले.त्या प्रसंगी जाधव बोलत होते.


 यावेळेस साहेबराव जाधव (मा. उपसभापती सातारा पं.स.) , लोकनियुक्त सरपंच निलेश जाधव , नारायण  जाधव (उपसरपंच) क्षेत्रमाहुलीचे  ग्रामस्थ उपस्थित होते.

            कामगार नोंदणी व कामगार योजनेच्या बद्दलची माहिती व वितरणासाठी क्षेत्रमाहुली विकास मंच चे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .

To Top