भोर तालुका शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करणार:-गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांचे प्रतिपादन.
भोर (प्रतिनिधी)
शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे .कोरोना महामारी च्या काळात आपण ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया हे शिक्षकांनी सिद्ध करून दाखवलं .कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून शाळेतील विद्यार्थ्यांचे गट करून जास्तीत जास्त कृती युक्त शिक्षणावर भर द्यावा ,आगामी काळात प्राथमिक शिक्षणाचं आधुनिक व्हिजन घेऊन भोर तालुका शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करणार असे प्रतिपादन भोर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले.
आळंदे ता. भोर येथे दि.10 डिसेंबर रोजी आळंदे केंद्रातील शाळांची सहविचार सभा घेण्यात आली .सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची सहविचार बैठक होऊन त्यानंतर सर्व शिक्षक यांची बैठक घेण्यात आली.
त्याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सोनवणे बोलत होत्या. सोनवणे म्हणाल्या की शासन नियमांचं पालन करीत विद्यार्थी गट करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी पालकांच्या संमतीने, परवानगीने जाऊन कृतीवर भर द्यावे.मुलांची क्रिएटिव्हिटी वाढेल,ते सायंटिफिक होतील,असे शिक्षण देऊन ताणविरहित कृतिशील,आत्मविश्वास वाढेल अश्या पध्दतीने शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केले
या सहविचार सभेत इंगवली ,आळंदे आळंदी वाडी ,कासूर्डी गुमा तेलवडी, निगडे खे. बा. ,धांगवडी, अनंत नगर इत्यादी शाळांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, या वेळेस उपस्थित होते. ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण पद्धती, आगामी समस्या व विद्यार्थी गुणवत्ता याविषयी शाळांतील शिक्षक,मुख्याध्यापक यांनी आपापली मते मांडली .शिक्षकांच्या कामाचा व दैनंदिन कामकाजाच्या उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख सुरेश आवाळे उपस्थित होते.
या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत कृतिशील ठेवण्यासाठी सुरक्षित प्रयत्न करावेत याची माहिती देण्यात आली.उपस्थितांचे स्वागत दत्तात्रय पांगारे यांनी करून आभार संदीप जगताप यांनी मानले.



