श्रीगोंदा येथे 'युनिटी मेडिकेअर'चे उदघाटन उत्साहात संपन्न.
श्रीगोंदा (प्रतिनिधी):-
मेडिकेअर क्षेत्रात प्रत्येकजण आप -आपल्या परीने काम करीत आहे. हे काम प्रामाणिक, सचोटी, सेवा भावी वृत्तीने केल्यास लोकांच्या मनात ती व्यक्ती व त्यांचे काम कायमस्वरूपी लक्षात राहते, आणि ते नाव व काम लोकप्रिय ब्रँड बनते,मेडिकेअर क्षेत्रात युनिटी मेडिकेअरने स्वतःचा वेगळा ब्रँड बनवला असून त्यांच्या शाखा राज्यभर मोठ्या ताकदीने उभ्या राहत आहेत, असे प्रतिपादन कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल दादा जगताप यांनी केले.
श्रीगोंदा येथे सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजता उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्याप्रसंगी चेअरमन जगताप बोलत होते.पुणे शहर ,पिंपरी चिंचवड व हवेली परिसरात युनिटी मेडिकेअर च्या शाखा उभ्या राहिल्या आहेत. आम्ही सेवाभावी भावनेने लोकांची मागणी व गरज ओळखून प्रामाणिक काम करीत आहे. या पाठीमागे लोकांचे, मित्र परिवार यांच्या असंख्य शुभेच्छा व आशिर्वाद आहेत.असे मत महाराष्ट्र राज्य युनिटी मेडिकेअरचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गदादे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन युनिटी मेडिकेअर चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गदादे व सहकारी सागर लगड यांनी केले होते.


