वेल्हे तालुक्याला 'राजगड' नाव द्या:-शिवसेनेची मागणी.
शिवरायांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्राची पहिली राजधानी असलेला "राजगड" हा तालुका म्हणून देशाच्या नकाशावर येऊन शिवरायांच्या विश्वंदनिय लोककल्याणकारी कार्याचा गौरव व्हावा यासाठी वेल्हे तालुक्याला "राजगड" नाव देण्यात यावे ,अशी मागणी तालुक्यातील मावळ्यांची अनेक वर्षांपासून आहे.ती मागणी पूर्ण व्हावी असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिवसेनेचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख कुणालभाऊ साळुंके पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिवसेनेचे उपनेते रवींद्रजी मिर्लेकर ,व पश्चिम महाराष्ट्र शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे आणि पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख वेल्हे चे शैलेंद्र वालगुडे,यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला 'राजगड तालुका' हे नाव नामकरण मिळावे अश्या मागणीचे निवेदन शिवसेना वेल्हे तालुक्याच्या वतीने वेल्हे तहसीलदार व भोरचे प्रांत यांना दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी देण्यात आले.
याप्रसंगी कुणालभाऊ साळुंके पाटील,शैलेंद्र वालगुडे युवराज जेधे,दिपक दामगुडे,संतोष रेणुसे,अंकुश चोरघे,सुशांत भोसले,केदार देशपांडे,नितीन सोनवले,मारुती सरपाले,जनाभाऊ कडू, गणेश ऊफाळे,अक्षय वालगुडे,संजय लिम्हण सुनिल शेंडकर,अनिल पारठे,प्रकाश भावळेकर,किशोर ऊफाळे,राजेश दामगुडे,पप्पु ननावरे आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

