पुणे पदवीधर मतदार संघात शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार यादीत पुणे जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी 'आदित्य बोरगे' यांच्या नावाची चर्चा .........
पुणे (शहर प्रतिनिधी)
पुणे पदवीधर मतदार संघात शिवसेनेने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येते आहे
पुणे पदवीधर मतदार संघात शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार यादीत पुणे जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी आदित्य बोरगे यांच्या नावाची चर्चा आहे. स्वतंत्ररित्या पदवीधर ची निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना भाजप घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते आहे.
नुकत्याच पुण्यात झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमेदवारात पुणे जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी आदित्य बोरगे यांच्याही नावाची शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे,असे विश्वसनीय माहिती सूत्रांनी न्यूज वार्ताला दिली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी:- अक्षय शिवाजीराव आढळराव-पाटील ,आदित्य बोरगे, आनंद दवे ,प्रीतम उपलप.

