गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांचा भोर तालुका शिक्षक समितीकडून सत्कार .
भोर (प्रतिनिधी)
भोर पंचायत समिती 'गटशिक्षणाधिकारीपदी' नव्याने रुजू झालेल्या 'अश्विनी सोनवणे' यांचा विशेष सत्कार पंचायत समिती, भोर येथे 'भोर तालुका शिक्षक समिती' यांच्याकडून करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात प्रतिभावन्त व कार्यक्षम म्हणून परिचित असलेल्या अश्विनी सोनवणे यांची गडचिरोली जिल्ह्यातून(भामरागड)येथून पुणे जिल्ह्यात भोर पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी पदी नेमणूक झाली. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळेस भोर शिक्षक समितीचे पदाधिकारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळेस भोर तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक उपक्रम व ऑनलाईन शिक्षण याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी भोर शिक्षक समिती महिला आघाडी प्रमुख राजश्री रायकर पवार,शुभांगी खोपडे ,उपाध्यक्ष कें.प्र. एस. के.कदम,शिवाजी शिंदे, शिक्षक नेते संजयराव पवार, अध्यक्ष महेंद्र शिंदे, प्रवक्ते रविंद्रनाथ थोपटे, सहचिटणीस शरदराव पवार. संघटक शशिकांत भागवत, सरचिटणीस सुरेश खोपडे व भोर पं. स.शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

