रविंद्र तहकिक याचेवर कठोर कारवाईची गृहमंत्र्यांकडे शिक्षक संघाने केली मागणी.
बंडगार्डन पोलीस स्टेशन ,येथे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून गुन्हा दाखल.
पुणे (प्रतिनिधी):
दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने काल दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रमध्ये प्रसिद्ध झालेल्या शिक्षकांविषयी आक्षेपार्ह लेखाबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली .तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिशय खालच्या भाषेत केलेल्या या लेखणाचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदारांच्या वतीने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे , जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे सर,राज्य उपाध्यक्ष विनायकराव ढोले ,पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते सचिन डिंबळे,पुणे महानगरपालिका संघाचे शहर अध्यक्ष रवींद्र सातकर, पुणे जिल्हा कार्यालयीन चिटणीस व जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस संतोष पानसरे,जुन्नर विभाग प्रमुख सचिन नांगरे,तसेच संघ शिलेदार संतोष गगे,रमेश दाभाडे ,गणेश डुंबरे व सर्व संघ पदाधिकारी उपस्थित होते.

