संयुक्त महाराष्ट्रासाठी “राज्यपाल पद” नाकारणारे भोरचे भूमीपुत्र आणि एकमेव मराठी नेते,देशभक्त केशवराव जेधे.

Maharashtra varta

 संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी “राज्यपाल पद” नाकारणारे भोरचे भूमीपुत्र आणि एकमेव मराठी नेते,देशभक्त केशवराव जेधे. 



भोर (प्रतिनिधी)

सरदार कान्होजी जेधे देशमुख यांचे वंशज देशभक्त केशवराव जेधे (आंबवडे शाखा) यांची आज दि.13 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी साजरी होत असताना त्यांनी केलेले आदर्श काम आज समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे. हा फक्त माणूस नव्हता, तर जिवंत एक विचार होता. त्यांच्या प्रत्येक कार्यात समाजाबद्दल तळमळ व श्रद्धा होती. 

त्यांचे कार्य  पुढील प्रमाणे:-

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगतील पहिले स्मारक पुण्यात व्हावे यासाठी जेधे मॅन्शन मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली सभा केल्या.

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन पुण्या मध्ये “मराठा बोर्डींग” ची स्थापना केली.

१९१९ साली “श्री शिवाजी मराठा सोसायटी” व “अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद” ची स्थापना केली.

१९२६ साली भारतरत्न डॅा भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली वकिली केस जेधेंची घेतली- देशाचे दुश्मन पुस्तक प्रकरण. केस जिंकली.

१९२५ साली “देशाचे दुश्मन” पुस्तक प्रकरणात ६ महिने तुरूंगवास

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना गुरु मानून त्यांच्या कार्यात १९२२ पासून सहभाग.

 महात्मा गांधी जेधे मॅन्शन ला भेटायला आले. कॅांग्रेस पार्टी मध्ये आमंत्रण.

“पुणे करार” मध्ये भारतरत्न डॅा. भीमराव आंबेडकर यांची बाजू धरली व मागास जातीच्या लोकांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून आग्रह धरला. 

जेधेंनी १९२७ साली पुण्यातील पाण्याचे सर्व हौद सर्वसामान्य जनतेसाठी सार्वजनिक पद्धतीने खुले करण्याचा ठराव पालीकेत पास केला.

 केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर हे भारतरत्न डॅा. भीमराव आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख पाहुणे होते. १९३४ साली “भारतीय कायदे मंडळ” मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाली

(महात्मा गांधींची शिफारस)

 १९२९ साली पर्वती सत्याग्रह केला. पर्वती व सारसबाग या सत्याग्रहानंतर सार्वजनिकरित्या खुले केले.


१९२५-१९३० मध्ये सत्यशोधक विचार महाराष्ट्रामध्ये घराघरात पोचवले.

१९३७ साली सेनापती बापटांच्या आग्रहानंतर केशवराव जेधे कॅांग्रेसचे अध्यक्ष बनले. कॅांग्रेसचे सदस्य चौपट वाढले.

सुभाषचंद्र बोस केशवराव जेधेंना भेटायला घरी जेधे मॅनश्न ला आले. कॅांग्रेसचा प्रचार करायला बंगाल ला यायचे आमंत्रण दिले.

 महात्मा गांधींच्या “चले जाव” आंदोलन मध्ये मुंबई येथे सहभाग व इंग्रजांविरूद्ध जोरदार भाषण .या सभेनंतर गांधीजी आगाखान पॅलेस मध्ये तर केशवराव जेधे व नरहर विष्णू गाडगीळ नाशिक जेल मध्ये दीड वर्ष तुरूंगवास भोगला.

१९४६ मध्ये महाराष्ट्र कॅांग्रेस चे पुन्हा अध्यक्ष

भारतीय घटना सिमितीचे अध्यक्ष “डॅा. भीमराव आंबेडकर” यांना  करावे असे महाराष्ट्र कॅांग्रेसचे अध्यक्ष या नात्याने पंडित नेहरूंना शिफारस पत्र .

१९४८ साली महात्मा गांधींच्या हत्ये नंतर कॅांग्रेस सोडली

१९४६ मध्ये केशवराव जेधे भारतीय घटना समितीचे सदस्य. घटनेत शेतकरी व कामगारांचे कायदे करण्याची मोलाची कामगिरी.

१९४८ साली मुंबई सह महाराष्ट्र राज्य व्हावे ही मागणी नेहरूंकडे केली.

१९४८ साली केशवराव जेधे व शंकरराव मोरे यांनी “शेतकरी कामगार पक्षाची” स्थापना केली. १९५० साली “मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य” व्हावे ही संकल्पना मांडली.

 १९५७ साली बारामती लोकसभा चे पहिले खासदार केशवराव जेधे निवडून आले.

 जेधेंबरोबर आचार्य अत्रे, ना.ग. गोरे, प्रबोधनकार ठाकरे, आण्णाभाऊ साठे, एस.एम जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली.

 भाषेच्या आधारावर राज्य होणे शक्य नाही, असा नेहरूंचा पवित्रा जेधे व त्यांचे समर्थक यांनी अमान्य केला.  १९५८-१९५९ मध्ये अखेर नेहरूंनी मुंबई सह महाराष्ट्रावर शिक्कामोर्तब केला.

१९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष केशवराव जेधे

१९५९ ला संयुक्त महाराष्ट्र समितीला यश मिळाले

१० नोव्हेंबर १०५९ ला शनिवार वाड्यावर हिंदू महासभा आयोजित शिव-दिग्विजय दिन सभा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल वध करून ३०० वर्ष झाली होती. या सभेचे अध्यक्ष जेधे होते.

त्यांना भाषण झाल्यावर अर्धांगवायुचा झटका आला. मित्र अत्रे जेधेंना दवाखान्यात घेऊन गेले.

१२ नोव्हेंबर १९५९ साली ना. ग. गोरेंच्या भेटीनंतर देशभक्त केशवराव जेधे कालवश झाले.

या सभेत त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आचार्य अत्रेंवर भारत-चीन युद्ध परिस्थिती वरून जोरदार टिका केली होती.

१ मे १९६० ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. भारत मातेचा सुपूत्र देशभक्त केशवराव जेधेंना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

स्वारगेट पुणे येथे देशभक्त केशवरावांचे  नाव एका पुलास दिले आहे.

भोरचे भूमीपुत्र म्हणून खरच अभिमान वाटतो.

_____________________________

   माहिती,संकलक :- साभार:-

 दिग्विजय सर्जेराव जेधे.

To Top