चंदा ताई वाडकर यांची "दिपावली कवीता".
बारामती (प्रतिनिधी)
सणांचा राजा असा दीपोत्सव सुरु होतोय. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी सर्वांना दीपावली या कवितेतून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे,प्रतिभावन्त साहित्यिक चंदा ताई वाडकर.
🌺दीपावली🌺
आसमंत उजळला
लख्ख दिव्यांनी
नकळत मन होई
आनंदी उल्हासी
सुखसमृद्धीची आली दीपावली..
निरोगी जीवन देई
अभ्यंग स्नान पर्वणी
अत्तराप्रमाणे दरवळो
यशाचा सुगंध जीवनी
सुखसमृद्धीची आली दीपावली ...
गोड,खमंग फराळाचा
कवळ घेता वदनी
तृप्त करी क्षुधा असा
हा दीपोत्सव अंगणी
सुखसमृद्धीची आली दीपावली....
दिवाळी पाडवा स्नेह
पतीपत्नीतील वाढवी
भाऊबीज बहीणभावाच्या
नात्याची अवीट गोडवी
सुखसमृद्धीची आली दीपावली ...
लक्ष्मीपूजनाने ऐश्वर्य लाभावे
कुविचारांची जळमटे झटकून
मनही स्वच्छ,लख्ख व्हावे
मनोकामना पूर्ण व्हावी ही
दीपावलीच्या शुभ आगमनाने..
आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!💐💐💐💐💐___________________________________
श्री. व सौ.चंदा वाडकर व परिवार.
__________________________________
कविता आवडल्यास इतरांना शेअर करा. व आमच्या लोकप्रिय न्यूज वार्ताच्या पोर्टलला फॉलो करावे.

