आझाद फाउंडेशन व राष्ट्र सेवा समूहाकडून दिवाळीचा फराळ वाटप.

Maharashtra varta

 पानशेत भागांत कातकरी पाड्यात आझाद फाउंडेशन व राष्ट्र सेवा समूह यांच्या वतीने धान्य व दिवाळीचा फराळ वाटप. 


पानशेत( प्रतिनिधी)

सणांचा राजा म्हणजे दिवाळी. या दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व जण एकत्र येतात,एकमेकांना सुख समृद्धीच्या शुभेच्छा देतात. ही आनंदाची  दिवाळी कायम  येवो,हे जसे महत्वाचे आहे ,तसे आपल्या मुलांना  शिक्षण देणे, त्यातून सर्वांगीण विकास साधणं हे महत्त्वाचे आहे, आपल्या मुलांना शिक्षण,देऊन शिक्षित करा,असे आवाहन पुणे जिल्हा प्रहारचे युवा नेते व आदर्श रुग्णसेवक नयनभाऊ पुजारी यांनी  केले.


 (दि. 15 ) रोजी दिवाळीनिमित्त कातकरी पाड्यात  व गोरगरीब ,वंचित लोकांना आझाद फाउंडेशन व राष्ट्र सेवा समूह यांच्या वतीने व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आवाहनानुसार व प्रहारचे राज्याचे युवा नेते गौरव भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  आदिवासींना धान्य व दिवाळीचा फराळ व लहान मुलांसाठी मिठाई देण्यात आली. त्यावेळेस पुजारी बोलत होते.

खडकवासला ते पानशेत परिसरातील गावांत मिठाई देण्यात आली.यावेळी अमोलभाऊ मानकर,  सुरभी जगताप, उमेश महाडीक, नयन पुजारी,संतोष साठे, अनिकेत कदम व इतर  कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन व संयोजन केले होते.

To Top