जिणं संघर्षाचं.
अचाट धैर्याचं..
भोर (प्रतिनिधी)
दि.15 नोव्हेंबर 2020 रोजी भोर तालुक्याचे सामाजिक व राजकीय युवा नेते मनोज धुमाळ हे भोर ला गेले असता, त्यांना दोन व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना आढळल्या,मात्र त्यांचे जगणे संघर्षाचे आहे.जीवनात खचलेल्या माणसांनी एकदा अशा लोकांची जिद्द जरूर पहावी असे, त्यांनी "न्यूज वार्ताशी" बोलताना सांगितले.
मनोज धुमाळ यांनी ही माहिती देताना सांगितले की,भोरला कामानिमित्त मी गेलो असता, गाडी एस.टी.स्टँडमध्ये लावली व बाहेर पडत असताना स्टँडमध्ये पाण्याच्या पडीक टाकीलाच आपलं घर करून तिथेच आपले जीवन उघड्यावर व्यतीत करत आहेत अशा दोन व्यक्ती आढळल्या.कपडे व एकूण अवतार पाहता त्यांची परिस्थिती खुपच दयनीय वाटली.
अधिक माहिती घेतली असता, त्यातील एक जण नेरे गावचे तर दुसरे धोंडेवाडी गावचे रहिवासी असल्याचे सांगितले.पैकी नेरे गावचे असलेले ती व्यक्ती बोलली की, मुलगा,पत्नी २ महिन्यांपूर्वी मयत झाले त्यामुळे गाव सोडल्याचं सांगत आहेत.त्यामुळे आपला चरितार्थ चालवण्यासाठी या वयात देखील बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवून आपलं आयुष्य जगत आहेत.माझ्या घरी आवश्यक त्या वस्तू आहेत तरी पण त्यांना केवळ मदत म्हणा किंवा कर्तव्य म्हणून मी त्यांचेकडून एक टोपले विकत घेतले.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, आपण मॉल मध्ये किंवा मोठ्या ठिकाणाहून खरेदी करतो त्याच प्रमाणे या अशा जीवनाशी दोन हात करणाऱ्या माणसांकडून काही खरेदी करावी.
टीप-
फोटो पाहाल तर त्यांचं जीवन कसं जगत आहेत ते आपल्या समोर येईल.
मी पाहिलेले ते दृश्य खुप विदारक वाटले पण त्यातून देखील जीवन जगण्याची त्यांची कला आपल्या मनाला एक नवी उभारी देते.
नाव-
1)पहिली व्यक्ती---श्री.तुकाराम मनाजी जाधव
पत्ता-नेरे,ता.भोर,जि.पुणे
2)दुसरी व्यक्ती ----- श्री.धोंडे
धोंडेवाडी, ता.भोर, जि. पुणे.
(सध्या दोघे - एस.टी.स्टँड मधील पाण्याची पडीक टाकी येथे रहात आहे.)
_______________________________
✍️लेखन निर्मिती✍️
मनोज धुमाळ
पसुरे


