वेनवडी(भोर) येथे कै. बनुबाई चव्हाण यांच्या तेरावा विधीच्या प्रसंगी चव्हाण कुटुंबियांनी रक्तदान शिबिराचा राबविला आदर्श उपक्रम.
भोर ( प्रतिनिधी)
कै. बनुबाई कोंडीबा चव्हाण यांच्या तेरावा विधी च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत चव्हाण कुटुंबियांनी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला.
भारती हॉस्पिटल पुणे रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले .यावेळी सार्वजनिक वाचनालयासाठी कपाट व शंभर पुस्तके देण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब भोरचे मा.अध्यक्ष डॉ. आनंदा कंक, बाबाजी साळेकर ,रामचंद्र चव्हाण ,रमेश चव्हाण, रत्नाकर कंक, संतोष चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, मंगेश चव्हाण, सागर चव्हाण, संतोष चव्हाण, विनोद चव्हाण, सचिन चव्हाण समीर चव्हाण ,उल्हास संसारे, अतुल चव्हाण, शिवाजी चव्हाण, मारुती सावंत, भारती हॉस्पिटल रक्तपेढी आसिफ शेख इत्यादी व वेनवडी चे सर्व ग्रामस्थ ,तरुण उपस्थित होते.