शरद तांदळे हा जिवंत विचार व अद्भुत रसायन:-गौरवभाऊ जाधव.

Maharashtra varta

 शरद तांदळे हा जिवंत विचार व अद्भुत रसायन:-गौरवभाऊ जाधव.



पुणे (विशेष प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

शरद तांदळे हा फक्त माणूस नाही,तर जिवंत विचार आणि प्रेरणा देणारे अद्भुत रसायन आहे. जे स्वतःबरोबर इतरांना प्रकाशवाटा निर्माण करतात,त्या जीवन जगण्याची दिशा दाखवतात, शरद रावांचे  व्यक्तिमत्त्व पुराणकथेस शोभेल, अशा अदभुत चमत्कारांनी भरलेले आहे. ह्या इंजिनीयर माणसाने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी, लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना,प्रतिकूल परिस्थितीत कादंबरी लिहिली; तीदेखील खूप सारे संशोधन करून, अचूक संदर्भ तपासले.  त्यांना कादंबरीचा विषय सुचला तो, ते लंडनला जाण्यासाठी विमानात प्रथमच बसले, तेव्हा त्यांना एकदम रावणाचे पुष्पक विमान आठवले, त्या पाठोपाठ गरुडपुराण.शरद तांदळे हा फक्त माणूस नाही,तर जिवंत विचार व अद्भुत रसायन आहे.असे गौरव उदगार  राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरवभाऊ जाधव यांनी काढले.


शरद तांदळे सर लिखित रावण राजा राक्षसांचा व आंत्रप्रान्योर हे पुस्तक राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहायक गौरवदादा जाधव,यांना व भोरचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांना बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे भेट देण्यात आले.त्यावेळेस जाधव बोलत होते. 

शरद तांदळे सर लिखित रावण राजा राक्षसांचा व आंत्रप्रान्योर हे बेस्ट सेलर  पुस्तक असून  शरद तांदळे यांना ह्या उत्कृष्ट पुस्तक ,साहित्य लेखनाबद्दल राज्य,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

 या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू मोरे, रुग्णसेवक नयन पुजारी,रुग्णसेवक अमोल मानकर,चेअरमन करणराजे बांदल,राष्ट्रसेवा समूहाचे प्रवक्ते रणजीत जोरे,प्रहार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हरी उफाडे,वाघोली चे ग्रा.प. सदस्य बाजीराव पाचारणे,शरद गरकळ आदी हजर होते.



To Top