कापूरहोळ( प्रतिनिधी):-
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले कामथडी गावच्या हद्दीतील खुटवड वस्ती येथील महामार्गालगत श्रीजी गृह उद्योग संचलित,जळगावचे खानदेशचे सुप्रसिद्ध चुलीवरील केळीचे वेफर्स व फरसाण उत्कृष्ट चवीचे असून कमी कालावधीमध्ये ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या वेफर्स व फरसाणाला अधिकाधिक मिळताना दिसत आहेत.
श्रीजी गृह उद्योग संचलित,जळगावचे खानदेशचे सुप्रसिद्ध चुलीवरील असणारे फरसाण व केळीचे वेफर्स च्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध शाखा आहेत. तसे पुण्यामध्ये देखील वेफर्स फरसाणाचे केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून भोर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या कंपनीच्या हद्दीतील हे खानदेशचे सुप्रसिद्ध चुलीवरील केळीचे वेफर्स फरसाण याची चव घेण्यासाठी विविध ठिकाणांचे नागरिक, प्रवासी, महिला या ठिकाणी आवर्जून ,खरेदी करताना दिसत आहेत. हे फरसाण चविष्ट असून चांगल्या दर्जाचे मटेरियल यासाठी वापरले असून हे संपूर्ण चुलीवरती बनवले गेले असल्यामुळे याला विशिष्ट प्रकारची टेस्ट आहे .आणि ही टेस्ट घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत .हे फरसाण व वेफर्स कमीत कमी किंमतीत मिळत असल्याने सर्व जण खरेदी करताना दिसत आहे.
याबाबत श्रीजी गृह उद्योग संचलित,जळगाव खानदेश चे चेअरमन विलास पाटील यांनी बोलताना सांगितले की, आम्ही हे संपूर्ण विविध प्रकारचे फरसाण व केळीचे वेफर्स हे चुलीवर बनवले आहे. आणि यामध्ये याला चांगल्या कंपनीचे बेसन पीठ, तेल,इत्यादी व खाद्य सामग्री चांगली वापरले असल्याने त्याला चव छान आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी येथील केळी वेफर्स व फरसाणाचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.
यावेळेस मॅनजर सुनील सोनवणे (मामा) व त्यांचे सहकारी हे वेफर्स व फरसाण तयार करीत आहे.