झी टॉकीज वाहिनीवर ह.भ.प.ॲड.राहुल महाराज पारठे यांचे अप्रतिम कीर्तन सेवा संपन्न.
भोर (प्रतिनिधी)
दि. 2,ते 4 नोव्हेंबर 2020 रोजी सलग तीन दिवस सायं. 6 वाजता "झी टॉकीज वाहिनीवर (मन मंदिरा, गजर भक्तीचा) या मालिकेत भोर तालुक्यातील आपटी गावचे रहिवासी असणारे व अध्यात्मिक ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था, भोर आपटीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.ॲड.श्री.राहुल महाराज पारठे (आपटीकर)यांची किर्तनसेवा तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक,माता भगिनींनी मनापासून श्रवण केली.
महाराष्ट्रातून ह.भ.प.ॲड.श्री.राहुल महाराज पारठे (आपटीकर)यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक हितचिंतकांनी, मित्र-मंडळींनी, परमार्थप्रेमी बांधवांनी फोन कॉल,व्हाट्सएप,फेसबुक सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्वत्र कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
गेली तीनही दिवशी ह. भ. प. राहुलमहाराजांचे अप्रतिम किर्तनसेवा उत्कृष्ट रित्या संपन्न झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी,धारकरी,व नागरिकांनी कीर्तन लक्षपूर्वक श्रवण केले. ह. भ. प.राहुल महाराज पारठे यांनी आध्यात्मिक, राष्ट्रप्रेम,सामाजिक विषयावर मार्मिकपणे मांडणी करून किर्तनातील दृष्टांत युवक वर्गास प्रेरणा देणारे होते.राहुलच्या रुपाने एक उच्चशिक्षित (वकील)युवकाने आपल्या भोर तालुक्याचे तथा मावळ प्रांताचे नाव संपूर्ण राज्य, देशात दुमदुमून टाकले.आज राहुलच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान भोरकरांना वाटत आहे.
राहुल महाराज यांच्या उज्वल भविष्यासाठी पांडुरंग चरणीं प्रार्थना.रामकृष्ण हरी.