शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी:- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड.
मुंबई (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, त्याचबरोबर शिक्षकांना देखील दिवाळीची सुट्टी मिळणार आहे,अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण अखंडपणे चालू ठेवले आहे.