ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व आदर्श समाजसेवक "राजीव केळकर" यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा.
भोर (शहर):-प्रतिनिधी.
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
दि .5 नोव्हेंबर 2020 रोजी भोर शहर व तालुक्यातील विविध भागात ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व आदर्श समाजसेवक राजीव केळकर यांचा वाढदिवससामाजिक बांधिलकी जपत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त भोर येथील झोपडपट्टीतील गोर -गरीब अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय ,भोर येथे अंडी बिस्किट व फळ वाटण्यात आली. वाढदिवसानिमित्त भोर रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करून देण्यात आला, रुग्णालय इमारतीला रंगरंगोटी करून देण्यात आली. तसेच एक वाचमन केबिन देण्यात आली. भोर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव ,भोर पोलीस स्टेशन, भोर शिक्षक संघटना, व्यापारी असोशियन, जेष्ठ नागरिक संघ, तनिष्का महिला मंडळ, भोर नगरपालिका, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.