संघर्ष आणि संग्रामदादा एका नाण्याच्या दोन बाजू.
भोर( विशेष )शहर (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
करे अल्पज्ञानी, बहु जसा
निजनतेच्या अति खळखळाट॥
असे पुर्णज्ञानी, कमी बोलणारा।
विना नाद वाहे, जशी गंगाधारा॥
संघर्ष आणि संग्रामदादा एका नाण्याच्या दोन बाजू.अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा महाराष्ट्र चिंब करणारा एक कणखर आणि निर्भीड नेता जर कोण असेल तर, ते माननीय आमदार संग्रामदादा थोपटे होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून संग्रामदादा यांचे सर्वसामान्य ते असामान्य जनतेत नावलौकिक आहे.जनहितार्थ निर्णय,पार्दर्शक कारभार, कर्तव्यदक्ष, कामगारसंग्रह, संघटनेसाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच मा.संग्रामदादा होय. विकासात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी लागणार्या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,कामगार सेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजेच संग्रामदादा होय.
दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन राजकीय जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व संग्रामदादा यांच्यात पाहावयास मिळाले. दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. तळागाळातील जनतेच्या समस्या जाणणारा नेता म्हणुन दादांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे फायदे-तोटे, दुरगामी परिणाम यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची खास हातोटी दादांकडे आहे. याचा अनुभव मी खुप जवळुन घेतला आहे.आजही कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगावर थैमान घातले असताना अनेकांचे विविध प्रकारचे नुकसान झाले ,लॉकडाऊनच्या काळात ते अगदी आतापर्यंत अनेक गरजूंना दादांच्या मार्फत मोफत अन्नधान्य किट,कोविड सेन्टर उभारणी,अँबुलन्स पुरवठा ,व्हेंटिलेटर पुरवठा, वेल्हा सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात देखील कोविड सेंटर्स उभारणी,अशा अनेक कामाप्रसंगी कधी स्वतःचा विचार न करता सतत मुंबई मंत्रालय जाणे येणे या दरम्यान कधी कोरोना संक्रमित झाले हे त्यांना देखील समजले नाही .सोबत सुविद्य पत्नी आणि महिला सक्षमीकरणाला बळकटी देणाऱ्या आदरणीय स्वरूपाताई थोपटे यांना देखील कोरोना झाला परन्तु ज्याच्या पाठी मानवी शक्ती तो जगज्जेता, म्हणून तीन तालुक्यातील असंख्य जनतेचे प्रेम ,थोपटे साहेबांची पुण्याई आणि स्वतः दादांचा आत्मविश्वास या सगळ्यांच्या जोरावर दोन दिवसांपूर्वीच दादा सुखरूप घरी पोहोचले ,
जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नवीन युवा कार्यकर्त्यांची मोट बांधून भोर, वेल्हा, मुळशी च्या विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच दादांनी आपल्या कार्यशैलीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले.महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळ विस्तार झाला, त्यावेळी अनेक कार्यकर्ते अपेक्षित होते, दादांना मंत्रिपद मिळणार ,पण कपटी आणि कलुषित राजकारणाने पुन्हा एकदा थोपटे कुटुंबियांवर घात करण्यात आला .परंतु आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. पदासाठी ना, खुर्चीसाठी ना,ना नावासाठी .आदरणीय लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेब ह्यांच्या शिकवणीप्रमाणे आणि मोडेल पण वाकणार नाही, या उक्तीप्रमाणे आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे ना झुकले ना, वाकले म्हणूनच विधानसभे मध्ये दादांना विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून घोषविण्यात आले. आणि आजच म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा लोकलेखा समितीचे सदस्य पद देखील दादांना देण्यात आले,संपूर्ण महाराष्ट्र सर्वश्रुत आहे की महाराष्ट्रातील राजकारणात खरी पकड कोणत्या पक्षाची आणि कोणत्या नेत्यांची आहे परंतु ताठ बाणा आणि स्वाभिमानी पणा यामुळे थोपटे कुटूंब आजतागायत कधी कुणापुढे झुकले नाही, त्याचे अनेक तोटे देखील त्यांनाझाले परंतु शिल्लक राहिला तो स्वाभिमान ज्याप्रमाणे आम्हाला श्री .छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणात दिसला होता. त्याचप्रमाणे श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या आचरणात दिसला .आणि त्यांचेच मावळे म्हणून अभिमानास्पद वाटते, सरनोबत थोपटे तसेच आदरणीय लोकनेते माजी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. अनंतरावजी थोपटेसाहेब आणि अभिष्टचिंतन मानकरी कार्यसम्राट आमदार श्री.संग्रामदादा थोपटे.
आज त्यांचा जन्मदिवस मी आदरणीय दादांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आयुष्य निरोगी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
●शब्दांकन व लेखन ●
श्री.महेश विलासराव भेलके पाटील.
अध्यक्ष :-भोर तालुका काँग्रेस सोशल मिडिया सेल.
मो. नं.9960022885