दर्याची मासळी या मराठी कोळी गीताचा प्रदर्शन व उद्घाटन समारंभ संपन्न."
पुणे (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
दर्याची मासळी या मराठी कोळी गीताचा प्रदर्शन व उद्घाटन कार्यक्रम नुकताच पुण्यात पत्रकार भुवन येथे संपन्न झाला.नटेश्वर म्युझिक कंपनीने अगदी एक वर्षात महाराष्ट्रभर अनेक व्हिडिओ अल्बमची निर्मिती केली.व घराघरात आपली प्रभावी लोकसंस्कृतीचे- लोकगीते पोचवली .कोरोनाच्या काळात कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती, अशा काळात तब्बल दोनशे कलाकारांना काम उपलब्ध करून दिले. नटेश्वर म्युझिक कंपनी चे नुकतेच चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले गाणे "धर माझ्या हाताला" या गाण्याने युट्युब वर 80 लाख व्हीवर मिळवले आहे. नटेश्वर कंपनीचे सचिन अवघडे यांनी संगीत व सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे राखी चौरे यांनी गायलेले मराठी कोळीगीत दर्याची मासळी या गाण्याची व्हिडिओ अल्बम आज प्रदर्शित करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन नटेश्वरी म्युझिक कंपनीने केले.तसेच हे गाणे नटेश्वर म्युझिक या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित झाले आहे.
"धर माझ्या हाताला" या गाण्याचे अभिनेते प्रकाश धिंडले व अभिनेत्री सुषमा पाटील ही जोडी पुन्हा तुम्हाला "दर्याची मासळी" या गाण्यांमध्ये मुख्य अभिनय करताना दिसत आहे. तसेच कोळी गीताची निर्मिती सखाराम कातुर्डे यांनी केली असून कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. नटेश्वरी म्युझिक कंपनीचे "नथ मोत्याची नाकात आंबा" हेही व्हिडिओ गाणे प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पुढील काळात नटेश्वर म्युझिक कंपनी अजून अनेक लोकगीत कोळीगीत चित्रपट बनवणार आहे .त्यातून नवोदित कलाकार संगीतकार गायक यांना संधी देणार आहे.
"दर्याची मासळी" या मराठी कोळी गीताचा प्रदर्शन व उद्घाटन समारंभ पत्रकार भवन पुणे येथे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यामध्ये सखाराम कातुर्डे( संस्थापक नटेश्वर म्युझिक कंपनी) मेघराज राजे भोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) शरद गोरे (लेखक-दिग्दर्शक) दत्ताजी नलावडे (इतिहास संशोधक व लेखक)संगीतकार सचिन अवघडे सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे, सुप्रसिद्ध गायिका राखी चौरे व या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रकाश धिंडले व सुषमा पाटील हे होते.तसेच नटेश्वरी म्युझिक कंपनीचे संस्थापक सखाराम कातुर्डे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.