राज तोरण मिसळ हाऊसला पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कुणाल साळुंखे यांची सदिच्छा भेट.
नसरापूर ( प्रतिनिधी):-टी.पवार.
उद्योग व्यवसायात काम करताना धैर्य ,चिकाटी, जिद्द ठेवल्यास यश मिळते.यातूनच व्यवसायाला व व्यक्तीस नाव मिळते ,ते नाव कमावले आहे,राजतोरण मिसळ हाऊसचे चेअरमन सचिनशेठ बांदल यांनी., असे गौरव उदगार पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कुणाल साळुंखे यांनी काढले.
राज तोरण मिसळ हाऊसला पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कुणाल साळुंखे यांनी सदिच्छा भेट दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी दिली.त्यावेळेस ते बोलत होते.
कुणाल भाऊ साळुंखे यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पुणे पदी निवड झाल्याबद्दल राजतोरण मिसळ हाऊसच्या वतीनेसचिनराव बांदल यांनी विशेष सत्कार व अभिनंदन केले.त्याचबरोबर वेल्हा शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश दादा वालगुडे तसेच ग्रुप ग्रामपंचायत वीर वाडी चे मा. सरपंच विजय भाऊ शिळीमकर उपस्थिती होते.

